नागपूर : बॉसला प्रेमजाळ्यात ओढल्यानंतर मागितली खंडणी

Crime
Crime

नागपूर - बॉसला प्रेमजाळ्यात ओढल्यानंतर बदनामी करण्याची धमकी देऊन घसघशीत पगारवाढीसह ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या युवतीविरुद्ध अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी दीक्षा (वय ३०, रा. कॅफे लेडीज होस्टेल, रामनगर) असे आरोपीचे नाव आहे. 

अंबाझरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी क्रिष्णा (वय ४४, न्यू वर्मा ले-आउट, अंबाझरी) यांची कन्सल्टन्सी कंपनी आहे. या कंपनीत आरोपी दीक्षा ही १७ मार्च २०१७ ला ट्रेनी एक्‍झिक्‍युटिव्ह पदावर रुजू झाली होती. कार्यालयात काम करताना दीक्षाने क्रिष्णा यांच्याशी जवळीक साधली. रात्री उशिरापर्यंत त्यांच्या कार्यालयात थांबून ती त्यांना मदत करीत होती. दरम्यान, दोघांचे सूत जुळले. यानंतर दीक्षा ही क्रिष्णा यांच्या घरी वारंवार जाऊ लागली. एप्रिल २०१८ ते २९ जुलै २०१८ या दरम्यान दोघांचे आंतरिक मैत्रीपूर्ण संबंध वाढले. त्यामुळे दीक्षाने खोट्या बलात्काराच्या केसमध्ये फसविण्याची धमकी क्रिष्णा यांना दिली. त्यानंतर दीक्षाची कार्यालयातील वागणूक बदलली. अनेक वेळा तिने बदनामी आणि बरबाद करण्याची धमकी क्रिष्णा यांना दिली. त्यानंतर प्रकरण ‘सेटल’ करायचे असल्यास ५० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी क्रिष्णा यांच्याकडे केली. धमक्‍यांना कंटाळून क्रिष्णा यांनी अंबाझरी पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीवरून दीक्षाविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

पैसा आणि प्रमोशन 
क्रिष्णा आणि दीक्षा अनेक वेळा मुंबईतील ताज हॉटेलमध्ये मुक्‍कामी थांबले आहेत. या दरम्यान त्यांचे प्रेमसंबंध वाढले. दीक्षाला पैसा आणि प्रमोशन पाहिजे होते. त्यासाठी तिने क्रिष्णाला काढलेले व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. कंपनीत सहायक एचआर बनविण्यासाठी दबाव टाकला. 

आतापर्यंत उकळले तीन लाख
दोघांतील प्रेमसंबंधाचा बोभाटा करू नये म्हणून क्रिष्णा यांनी आतापर्यंत तीन लाख रुपये दीक्षाला दिले. तिने ५० लाख रुपये आणि एचआर म्हणून एक लाख रुपये प्रतिमहिना वेतनाची मागणी केली, तसेच तिने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचीही धमकी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com