ऑनलाईन खरेदी केला टीव्ही, निघाला खराब, वॉरंटीचे पैसे केले कंपनीने परत 

ऑनलाईन खरेदी केला टीव्ही, निघाला खराब, वॉरंटीचे पैसे केले कंपनीने परत 

खापरखेडा, (जि. नागपूर) : ऑनलाईन शॉपिंग साईटवरून टीव्ही खरेदी करणे खापरखेडा येथील एका ग्राहकाला चांगलेच महागात पडले आहे. कंपनीने पाठविलेला टीव्ही खराब निघाला तर विक्री माध्यम असेलेले ऑनलाईन शॉपिंग साईटचे ग्राहक सेवा प्रतिनिधी खात्यात पैसे जमा केल्याचे सांगत आहेत. यामुळे त्रस्त झालेल्या ग्राहकाने खापरखेडा पोलिसात तक्रार केली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, खापरखेडा वीज निर्मिती केंद्रातील कर्मचारी किशोर पौणिकर यांचा मुलगा पलाश याने ऑनलाईन शॉपिंग साईटवरून ऑफर असलेल्याने 28 सप्टेंबर 2019 रोजी रात्रीच्या सुमारास मोटोरोला 43 इंच एलईडी टीव्ही बुक केला. या टीव्हीची किमंत किंमत 29 हजार 999 रुपये व अतिरिक्त वारंटी शुल्क 200 रुपये असे एकूण 30 हजार 200 रुपयात कॅश ऑन डिलिव्हरी पद्धतीने देण्याचे ऑप्शन निवडले. फिल्पकार्ट कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने 30 सप्टेंबर रोजी टीव्ही आणून दिला. त्याला 30 हजार 200 रुपये देण्यात आले. 
घरी पोहचलेला टीव्ही सुरु होत नसल्याने त्यांनी कंपनीच्या प्रतिनिधीला बोलाविले. तपासणी दरम्याबन घरी आलेला नवा टीव्ही खराब असल्याचे मेकॅनिकने सांगितले. विक्रे ता कंपनीने एक्‍स्टा वारंटीसाठी 199 रुपये घेतले होते. याची तक्रार केल्यावर कंपनीने एक्‍स्टा वारंटीचे 199 रुपये पलाश पौनिकर यांनी दिलेल्या बॅंक खात्यात जमा केले. मात्र, उर्वरित रक्कम 29 हजार 999 रुपये जमा केली नाही. पलाश यांने कंपनीकडे उर्वरित रकमेबाबत विचारणा केल्यावर कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. यानंतर पलाशने खापरखेडा पोलिसात तक्रार दिली आहे. 

खातेच नाही तर पैसे जमा झाले कुठे? 
पलाश पौनिकर यांनी सांगितले की, कंपनीच्या 1800-2089898 या क्रमांकावर चौकशी केली. कंपनीच्या प्रतिनिधीकडून टीव्हीचे पैसे 11 ऑक्‍टोंबर 2019 रोजी एचडीएफसी बॅंकेत जमा केल्याचे सांगितले. मात्र, एचडीएफसी बॅंकेत माझे खातेच नाही तर पैसे कसे जमा होणार?. मी वारंवार फ्लिपकार्ट कंपनीकडे विचारणा करीत आहे. मात्र समाधानकारक उत्तर मिळत नाही. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com