'पुष्पगुच्छ देऊ शकतो महिलांना रोजगार'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

नागपूर - फुलांच्या विविध प्रकारांमधून तयार होणारे आकर्षक पुष्पगुच्छ गरजू महिलांना रोजगार देणारे उत्तम साधन ठरू शकते, असे मत केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्‍त केले.

नागपूर - फुलांच्या विविध प्रकारांमधून तयार होणारे आकर्षक पुष्पगुच्छ गरजू महिलांना रोजगार देणारे उत्तम साधन ठरू शकते, असे मत केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्‍त केले.

बजाजनगर येथील सारस्वत मंडळाच्या सभागृहात रविवारी लता व्यवहारे यांच्या ‘अनोख्या पुष्परेखा’ पुस्तकाचे प्रकाशन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार व संस्कार भारतीच्या अध्यक्ष कांचन गडकरी प्रमुख पाहुणे होते. शहराचे सौंदर्य वाढविण्यासाठी सिमेंट रोडच्या मधल्या भागात आकर्षक फुले लावण्याची कल्पना मी महापौरांना दिली आहे. या विषयातील हौशींसाठी एक स्पर्धा आयोजित करता येईल आणि त्यांच्या कल्पनांनुसार त्या त्या भागांमध्ये रस्ता दुभाजकाच्या भागात फुले लावता येईल. मुख्य म्हणजे फुलझाडे लावण्याची जबाबदारी नागपुरातील शिक्षण संस्थांकडे सोपविता येईल, असा विचार असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. लता व्यवहारे यांनी पुस्तकाच्या माध्यमातून केवळ आनंद नव्हे, तर सामाजिक संदेशही दिला आहे, असेही ते म्हणाले. संचालन रेणुका देशकर यांनी केले. मंगेश प्रकाशनचे प्रसन्न मुजुमदार व श्रीकांत व्यवहारे यांचीही उपस्थिती होती.

फुलांची शेती करा
शेतकऱ्यांनी विविध प्रकारांच्या फुलांची शेती करावी. यासाठी पुढच्या काळात अधिक प्रोत्साहन देण्यात येईल. फुलांची शेती डॉलरमध्ये उत्पन्न मिळवून देऊ शकते. येत्या काळात नागपुरातून जगभरात विमानप्रवास करता येणार आहे. त्यामुळे फुलांची निर्यातही मोठ्या प्रमाणात करता येईल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

Web Title: Bouquet is the best for the women