14 वर्षीय बालकाने रचले स्वतःचे अपहरणनाट्य 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

जरीपटका - आईने मारल्यामुळे 14 वर्षीय मुलाने स्वतःचे अपहरणनाट्य रचले. त्यात दोन मित्रांनाही सहभागी करून घेतले. दिवसभर बाहेरगावी राहिल्यानंतर घरी आल्यावर त्याने ही बाब स्पष्ट केली. त्यामुळे पोलिसही अवाक झाले. 

स्थळ जरीपटका. शनिवारी सकाळी साडेअकराची वेळ. 14 वर्षीय अभयच्या (नाव बदललेले) घरी दोन 12 वर्षीय मुले आली. अभय घरी नव्हता. ""पांढऱ्या व्हॅनमधून आलेल्या काही जणांनी अभयचे अपहरण केले आहे. आम्ही त्यांच्याकडे दगड भिरकावल्याने त्यांनी हे पाऊल उचलले,'' असे मित्रांनी अभयच्या आईवडिलांना सांगितले. शाळकरी मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार येताच पोलिसही हादरले. दोन वाजतापर्यंत अभयचा काही पत्ता नव्हता. नातेवाइकांकडे शोध सुरू झाला. पण, तो सापडेना. घरी चिंतेचे वातावरण होते. इकडे, अभय नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचला. तिथून तो गोंदियाकडे रवाना झाला. गोंदियात त्याचा मामेभाऊ राहतो. त्याने अभयच्या वडिलांना तो गोंदियात असल्याचे सांगितले. यामुळे या अपहरणनाट्यावरून पडदा पडला. त्यानंतर अभय घरी परतला. 

Web Title: boy created his own abduction