वाशीम जिल्ह्यात वीज पडून एक ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

शुभम बागल हा मुंबईचा राहणारा असून, त्याचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील सांगोला हे सांगण्यात आले आहे. त्यासोबत या अपघातात चेतन सोनटक्के (वय १७) हा किरकोळ जखमी झाला.

वाशीम : येथील यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेचा विद्यार्थी शुभम शिवाजी बागल (वय १७) याचा सैनिक शाळेजवळ बुधवार (ता.११) सायंकाळी ७ वाजता वीज पडून मृत्यू झाला.

शुभम बागल हा मुंबईचा राहणारा असून, त्याचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील सांगोला हे सांगण्यात आले आहे. त्यासोबत या अपघातात चेतन सोनटक्के (वय १७) हा किरकोळ जखमी झाला. सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडात झालेल्या पावसादरम्यान सैनिकी शाळेजवळ वीज पडली. त्यात सैनिकी शाळेत शिकणारा शुभम सापडला.

वीज अंगावर पडल्याने तो जागीच ठार झाला. त्यासोबत असलेला चेतन जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी पाठविण्यात आले.

Web Title: boy dead for lightning in Washim

टॅग्स