झोपलेल्या मुलाला ट्रकने चिरडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

कंपाउंडमध्ये चटईवर झोपलेल्या मुलाच्या अंगावरून ट्रकचे मागील चाक गेल्याने त्याचा मृत्यू झाला. अन्सार अहमद निसार अहमद (वय १४, संघवा, उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव आहे.

वाडी - कंपाउंडमध्ये चटईवर झोपलेल्या मुलाच्या अंगावरून ट्रकचे मागील चाक गेल्याने त्याचा मृत्यू झाला. अन्सार अहमद निसार अहमद (वय १४, संघवा, उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव आहे. 

याबाबत वाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर वाडी-अमरावती महामार्गावरील वडधामना येथील मीत ढाब्यासमोरील ईस्ट इंडिया ट्रान्सफर कंपनीच्या कंपाउंडमध्ये अन्सार अहमद निसार अहमद रात्री खाली चटईवर झोपला होता. मध्यरात्री बाराच्या सुमारास ट्रकचा (यूपी/७१/ए.टी १४१६) चालक श्रवणकुमार बाबूलाल सेन (वय ३८, सेमरा, फत्तेपूर, उत्तर प्रदेश) याने कोणतीही शहानिशा न करता ट्रक मागे घेतला. त्यामुळे चटईवर झोपलेल्या अन्सारच्या अंगावरून मागील चाक गेल्याने तो जागीच गतप्राण झाला. वाडी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. याप्रकरणी संभाजी बद्रीप्रसाद श्रीवास यांच्या तक्रारीवरून वाडी पोलिस ठाण्यात दोषी  ट्रकचालकावर गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली. पुढील तपास वाडी पोलिस करीत आहेत.

Web Title: Boy Death in Truck Accident Crime