दारू पिण्यावरून युवकाचा खून, चौघांवर गुन्हे दाखल

अनिल कांबळे
सोमवार, 25 जून 2018

नागपूर : दारू पाजण्यासाठी नकार दिल्यामुळे उद्‌भवलेल्या वादातून चौघांनी एकाचा काठीने हल्ला करून खून केला. हे हत्याकांड रविवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आले. डब्बा उर्फ कृष्णा सुखारी प्रसाद (वय 19, रा. राजू नगर, झेंडा चौक) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर हड्‌डी उर्फ संतोष गोंड, अर्जून शिवकुमार अजीत, लडी उर्फ राकेश आणि अशफाक मुबारक खान (सर्व रा.राजूनगर) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. या हत्याकांडानंतर एमआयडीसी परिसरात गॅंगवार पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. 

डब्बा प्रसाद आणि संतोष हड्‌डी यांची मैत्री होती. 14 जूनला रात्री आठ वाजता ते दोघेही दारू पिण्यासाठी एका भट्‌टीवर गेले. तेथे दारू पिण्याच्या पैशावरून वाद झाला. दोघांनीही एकमेकाला जबर मारहाण केली. दारूच्या भट्‌टीवरील मजुरांनी दोघांची समजूत घालून वाद मिटवला. दोघांनीही एकमेकांना पाहून घेण्याची धमकी दोघेही निघून गेले. शनिवारी रात्री आठ वाजता डब्बा हा दारू पिण्यासाठी भट्‌टीवर गेला. संतोष हड्‌डीला माहिती मिळताच तो अन्य तीन मित्रांसोबत तेथे पोहचला. डब्बा प्रसादला बाहेर खेचून त्याच्यावर लाथा-बुक्‍क्‍या आणि काठीने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या डब्बा प्रसादचा मृत्यू झाला. या प्रकरणी डब्ब्याचा भाऊ लक्ष्मण प्रसादच्या तक्रारीवरूचा चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. 

भीतीपोटी केला "गेम' 
गेल्या आठवड्यात दारू पाजण्यावरून डब्ब्या आणि संतोष हड्‌डीत वाद झाल्यानंतर मारामारी झाली. त्यावेळी दोघांनी एकमेकांचा "गेम' करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे दोघेही एकमेकांच्या भीतीपोटी लपून राहत होते. आपला "गेम' होण्यापूर्वीच डब्ब्याचा खून करण्याची योजना हड्‌डीने आखली. योजनेनुसार डब्ब्या दारूच्या भट्‌टीवर एकटा सापडला. चौघांनी मिळून त्याचा खून केला. 

Web Title: a boy killed for liquor drinking