नागपूर : प्रियकराने केला प्रेयसीवर बलात्कार 

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

प्रॉपर्टी डिलींगच्या एकाच कार्यालयात कामावर असताना युवतीची एकाशी मैत्री झाली. मात्र, युवकाने मैत्रीचा गैरफायदा घेऊन रूमवर नेऊन युवतीवर बलात्कार केला.

नागपूर : प्रॉपर्टी डिलींगच्या एकाच कार्यालयात कामावर असताना युवतीची एकाशी मैत्री झाली. मात्र, युवकाने मैत्रीचा गैरफायदा घेऊन रूमवर नेऊन युवतीवर बलात्कार केला. या प्रकरणी प्रेयसीच्या तक्रारीवरून प्रियकराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज सुनील राऊत (वय 27, रा. सहकार नगर, सोनेगाव तलाव) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी निशा (बदललेले नाव) ही पाचपावलीतील मोतीबाग परिसरात आई व बहिणीसह राहते. ती पूर्वी एका प्रॉपर्टी डिलरच्या कार्यालयात नोकरीला होती. त्याच कार्यालयात आरोपी पंकज राऊत हासुद्धा नोकरीवर होता. सोबत काम करीत असताना दोघांची मैत्री झाली. काही दिवसांत दोघांचे सूत जुळले.

1 जानेवारी 2018 ला पंकजने निशाला सोनेगाव परिसरात असलेल्या रूमवर नेले. तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने नकार दिला. पंकजने तिच्यावर बलात्कार केला. तेव्हापासून तो बदनामी करण्याची धमकी देऊन निशाला वारंवार रूमवर नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. दोघांनीही चार महिन्यांपूर्वी प्रॉपर्टी डिलरचे कार्यालयातील नोकरी सोडली आणि स्वतंत्र व्यवसाय थाटला.

या दरम्यान निशाने त्याच्यापासून दुरावा ठेवला. मात्र, पंकजने निशाला लग्न करण्याचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. परंतु लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे निशाने सोनेगाव पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A boy raped on her Girlfriend in Nagpur