तरुणीच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

उमरखेड (जि. यवतमाळ) - महाविद्यालयातील मुलीच्या त्रासाला कंटाळून १८ वर्षीय युवकाने मामाच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (ता.२५) रात्री ९.३० च्या दरम्यान नागापूर रूपाळा येथे घडली. मामाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सोमेश्वर मधुकर शेगोळे (वय १८) हा येथील गो. सी. गावंडे महाविद्यालयात बी. ए. प्रथम वर्षात शिकत होता. आईवडील लहानपणी वारल्याने तो नागापूर रूपाळा येथे मामाकडे राहत होता. त्याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. तिच्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले. त्या मुलीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मृताच्‍या नातेवाईकांनी पोलीसांकडे केली.

Web Title: Boy Suicide by Girl Trouble Crime