आजीच्या घरून निघालेला चिमुकला पाण्याच्या प्रवाहासोबत गेला वाहत 

The boy was swept away by the rain
The boy was swept away by the rain

हिंगणघाट (जि. वर्धा)  : बुधवारी तीन वाजेपासून ते सायंकाळी पाचपर्यंत झालेल्या मुसळधार पावसाने नाला दुथडी भरून वाहत होता. नाल्याच्या पुलावरून पाणी असताना जात असलेल्या कवघाट रोडवरील जुन्या कांजी हाऊसजवळील राहणाऱ्या असद खान रमजान खान पठाण या चार वर्षीय बालकाचा वाहात गेल्याने मृत्यू झाला. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सुरू झालेला पाऊस अंदाजे पाच वाजता थांबला. पाऊस थांबल्यानंतर आपल्या आजीकडे असलेला असद खान थोड्याच अंतरावर असलेल्या आपल्या घरी जाण्यास निघाला. त्याच वेळी घरासमोर असलेल्या नाला तुडुंब भरून वाहत होता. त्यामुळे घरात जाण्यासाठी पाण्यामधून त्याने निघण्याचा प्रयत्न केला. 

त्यावेळेस त्याच्या सोबत कोणीच नव्हते. आजीच्या घरून निघालेला चार वर्षीय बालक घरासमोर साचलेल्या पाण्यातून वाट काढत घरी जाण्यास निघाला, पण पाण्याचा प्रवाह एवढा होता की तो पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत गेला. कमीत कमी 15 ते 20 फूट अंतर तो वाहत गेला. घराशेजारच्या मागील बाजूला असलेल्या नाल्यात वाहत गेला तो कचऱ्याला लटकला. घरामागील असलेले नालीकाठची विटांची भिंत पडल्याने मोठा आवाज झाला. काय पडले ते पाहण्यासाठी असदची आई गेली असता मुलाचा मृतदेह तरंगताना आढळला. 

असदची आई मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते. तर त्याला पाच वर्षांची बहीणही आहे. याला पाच वर्षांची बहीणसुद्धा आहे. काही वर्षांपूर्वी त्याचे वडील कुटुंबीयांना सोडून निघून गेले. आईच मुलांचे पालनपोषण करायची. हा परिसर झोपडपट्टी परिसर म्हणून ओळखला जातो. या झोपडपट्टी परिसरात धड रस्ते नाही आल्या नाही ही पावसामध्ये यांच्या घरामध्ये पाणी साचून राहत असते. अशा परिस्थितीत हे लोक जीवन जगत आहेत. 

संपादन : अतुल मांगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com