ब्रह्मपुरीची वाघीण मेळघाटात सोडणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जून 2019

नागपूर : ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या ई-1 वाघिणीला अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्रप्रकल्पात सोडण्याचा निर्णय नुकताच प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी घेतला आहे. राज्यस्तरीय समितीने वाघिणाला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात यावे, असे दिलेल्या अहवालानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रह्मपुरी क्षेत्रात मानव-वन्यजीव संघर्ष वाढल्याने ई-1 या वाघिणीला वन विभागाने जेरबंद करण्याचे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी दिले होते. त्यानुसार 31 मे रोजी नवेगाव उपक्षेत्रातील कोरेगाव नियतक्षेत्रात वाघिणीला डार्ट मारून बेशुद्ध करण्यात आले.

नागपूर : ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या ई-1 वाघिणीला अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्रप्रकल्पात सोडण्याचा निर्णय नुकताच प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी घेतला आहे. राज्यस्तरीय समितीने वाघिणाला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात यावे, असे दिलेल्या अहवालानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रह्मपुरी क्षेत्रात मानव-वन्यजीव संघर्ष वाढल्याने ई-1 या वाघिणीला वन विभागाने जेरबंद करण्याचे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी दिले होते. त्यानुसार 31 मे रोजी नवेगाव उपक्षेत्रातील कोरेगाव नियतक्षेत्रात वाघिणीला डार्ट मारून बेशुद्ध करण्यात आले. पकडण्यात आलेली वाघीण दोन वर्षांची आहे. त्यामुळे तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर नागपूरमधील गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात हलविण्यात आले होते. दरम्यान, या वाघिणीच्या भवितव्याचा निर्णय घेण्यासाठी एक राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीने ई-1 वाघीण फक्त दोन वर्षांची आहे. तिला रेडिओ कॉलर लावून सोडण्यास हरकत नाही, असा अभिप्राय दिला होता. त्यानुसार प्रधान मुख्य वनसंरक्षकांनीही विचार करून वाघिणीला मेळघाट व्याघ्रप्रकल्पात सोडण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brahmapuri Waghin to leave in Melghat