सात लाखांची धाडसी घरफोडी

file photo
file photo

यवतमाळ : येथील ठोक फळविक्रेत्याकडे धाडसी घरफोडी करून चोरट्यांनी रोकड व सोन्याचे दागिने असा एकूण सात लाख रुपयांच्या मुद्देमालावर हात साफ केला. ही घटना रविवारी (ता.18) रात्री नऊच्या सुमारास येथील पांढरकवडा मार्गावरील गुलशननगरात घडली.
मोहम्मद हफिज मोहम्मद साहब (वय 50, रा. गुलशननगर) असे फळविक्रेता व्यावसायिकाचे नाव आहे. आठवडेबाजारात त्यांचा ठोक फळांचा व्यवसाय आहे. पांढरकवडा रोडवरील मेराज लॉनमध्ये साखरपुड्याचा कार्यक्रम असल्याने पत्नी व मुलीसह ते गेले होते. लहान मुलगा मित्रांसह फिरण्यासाठी बाहेर गेला.
मुलगा मोहम्मद काशीफ याने फोनद्वारे घरी चोरी झाल्याची माहिती वडिलांना दिली. तत्काळ नातेवाहकांसह घर गाठले असता, दरवाजाचे कुलूप तोडल्याचे दिसून आले. घरातील हॉलमध्ये असलेली आलमारी उघडी होती. त्यामधील सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. बेडरूममधील दिवानमध्ये ठेवून असलेल्या लोखंडी पेटीमधून रोख पाच लाख 57 हजार रुपये उडविले.
चोरट्यांनी दीड लाख रुपये किंमतीचे सोने, पाच लाख 57 हजार रुपये रोख असा एकूण सात लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल उडविला. या घटनेची माहिती येथील अवधूतवाडी पोलिसांना तत्काळ देण्यात आली. त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान स्थानिक पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com