ब्रायन लारा व्याघ्रदर्शनासाठी ताडोबात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

चंद्रपूर : वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा आज, बुधवारी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात दाखल झाला. सकाळी त्याने सफारीचा आनंद लुटला. या सफारीत त्याला वाघासह अन्य वन्यजीवांचे दर्शन झाल्याची माहिती आहे.

क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेशी संबंधित एका कार्यक्रमासाठी तो मुंबई येथे आला आहे. माजी भारतीय कसोटीपटू अनिल कुंबळे यानेच लाराला ताडोबा व्याघ्रप्रकल्पात सफारीसाठी जाण्याचा सल्ला दिला होता. लारा काल, मंगळवारीच येथे पोहोचला. कोलारा गेट परिसरातील एका खासगी रिसॉर्टमध्ये तो थांबला आहे. आज सकाळी त्याने कोलारा गेट येथून जंगल भ्रमंती केली. उद्या, गुरुवारला पुन्हा मोहूर्ली येथून सकाळी तो जंगल सफारीचा आनंद लुटणार आहे. हा दौरा कौटुंबिक असल्याचे बोलले जात आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची भुरळ आता सर्व जगाला पडली आहे. ताडोबा म्हणजे हमखास व्याघ्रदर्शन अशी ओळख पर्यटकांमध्ये आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी येथे आवर्जून हजेरी लावतात. सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, उद्धव ठाकरे यांनीही ताडोबात येऊन व्याघ्र दर्शन घेतले आहे. आता यात क्रिकेट जगतातील वाघ समजला जाणारा ब्रायन लारा याची भर पडली आहे.

Web Title: Brian Lara visited to Tadoba