
- नवरदेवाप्रमाणे नवरीलाही वरातीत घोड्यावर बसण्याची इच्छा असते, परंतु बहुतांश मुली अशाप्रकारची इच्छा बोलूनच दाखवrत नाही.
- परंतु, आता जग बदलतय, कुटुंबाचा पाठिंबा मिळाल्यास मुलीही अशाप्रकारचा आनंद उपभोगू शकतात.
यवतमाळ : नवरदेवाप्रमाणे नवरीलाही वरातीत घोड्यावर बसण्याची इच्छा असते, परंतु बहुतांश मुली अशाप्रकारची इच्छा बोलूनच दाखवत नाही. परंतु, आता जग बदलतय, कुटुंबाचा पाठिंबा मिळाल्यास मुलीही अशाप्रकारचा आनंद उपभोगू शकतात.
मुलगा-मुलगी एकसमान याचा प्रत्यय दिग्रस येथे नुकताच आला. येथील गाडगे परिवारातील मुलगी नेहा रवींद्र गाडगे हिचा शुभविवाह वर्धा येथील कुणाल शिवपाल कडू यांच्याशी झाला. गाडगे परिवाराने आपल्या मुलीच्या लग्नाची वरात घोड्यावर काढली.
यातून ‘मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी’ या म्हणीचा प्रत्यय आला. मुलीची घोड्यावर वरात काढून मुलगामुलगी एकसमान बोलूनच नाही तर कृतीतून साकारत समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला. स्त्री जन्माचे स्वागत करण्याचा संदेशही दिला.
त्याच बरोबर मुलीने वरातीमध्ये आजीआजोबा आणि इतर नातेवाइकांबरोबर नाचून नवरदेवाप्रमाणेच वरातीचा आनंद लुटला. मुलींनाही अशाप्रकारचा आनंद घेण्याचा अधिकार आहे आणि तो त्यांनी घेतला पाहिजे, असा संदेशच जणू नेहाने दिला.