पुलांचे 'स्ट्रक्‍चरल ऑडिट' सुरू - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

नागपूर - राज्यातील सर्वच पुलांचे "स्ट्रक्‍चरल ऑडिट' करण्यात येत आहे. ते पूर्ण झाल्यानंतर पुलांची दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी 2500 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली.

नागपूर - राज्यातील सर्वच पुलांचे "स्ट्रक्‍चरल ऑडिट' करण्यात येत आहे. ते पूर्ण झाल्यानंतर पुलांची दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी 2500 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली.

मुंबई-गोवा महामार्गावरील पुलांच्या दुरुस्तीचा प्रश्‍न सुनील तटकरे, भाई जगताप, भाई गिरकर, जयंत पाटील यांनी उपस्थित केला. बांधकाममंत्री म्हणाले, मुंबई-गोवा महामार्गावरील नद्या व कालव्यांवर 50 ते 100 वर्षांपूर्वी बांधलेले पूल आहेत. ते धोकादायक असल्याने त्यांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात येत आहे. त्यासोबत राज्यातील सर्वच पुलांची तपासणी करण्याच्या सूचना विभागांना दिल्या. राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी दिलेल्या उत्तरामुळे विरोधकांचे समाधान न झाल्याने गोंधळ घातला आणि दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. दरम्यान, सभापती रामराजे निंबाळकर यांनी ब्रिटिशकालीन बांधलेल्या पुलांबाबत चर्चा करण्यासाठी कोकणातील आमदारांची बैठक घ्या, असे निर्देश दिले. भाई जगताप यांनी यापूर्वीही बैठक झाली होती. मात्र, पुढे काहीच झाले नाही, असा मुद्दा उपस्थित केला.

सार्वजनिक बांधकाममंत्री म्हणाले, पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिटनंतर पुढील पाच वर्षांत 2500 कोटी रुपये पुलांच्या देखभाल दुरुस्तीसाठी खर्च केले जाणार आहेत. कोकणातील रस्त्यांची अवस्था अतिरिक्त वजनाच्या ट्रकची वाहतूक होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सावित्री नदीवरील पुलांच्या मृतांना मदत करण्यात आलेली आहे. तीन मृतदेह न सापडल्यामुळे त्याचा मुद्दा प्रलंबित आहे. त्यांनाही आर्थिक मदत करण्यास सरकार सकारात्मक आहेत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

राज्यात 27 हजार पूल
राज्यात ब्रिटिशकालीन आणि नव्याने बांधलेले 27 हजार पूल आहेत. त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी 1 लाख कोटी रुपयांचा खर्च लागणार आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागासाठी अर्थसंकल्पात असलेली तरतूद 3 हजार कोटींची असल्याचे बांधकाममंत्री पाटील यांनी सांगितले.

Web Title: bridge structural audit start