कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे 'मुंबई-हावडा'चा अपघात टळला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

अकोला - रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे बुधवारी मुंबई-हावडा मेलचा अपघात टळला. अकोला रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या बाजूचा रेल्वे रूळ तुटल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी वेळीच लाल झेंडा दाखवून गाडी थांबविल्याने पुढील अनर्थ टळला.

मध्य रेल्वेच्या अकोला रेल्वे स्थानकावर रेल्वे कर्मचारी रोजच्याप्रमाणे बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास रुळाची पाहणी करीत होते. या वेळी त्यांना प्लॉटफॉर्म क्रमांक दोनवरील पार्सल गेटसमोर रेल्वे रूळ तुटल्याचे आढळून आले. याच वेळी शेगावकडून नागपूरकडे जाणारी मुंबई-हावडा मेल अकोला रेल्वे स्थानकावर येणार होती. अचानक उद्‌भवलेल्या या प्रसंगामुळे रेल्वे कर्मचारी घाबरले. मात्र, प्रसंगावधान राखत त्यांनी लगेचच वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन रुळाच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. दरम्यान, वरिष्ठांनीही या मार्गावरून येणाऱ्या गाडीचे लोकेशन घेतले. मुंबई-हावडा मेलने गायगाव स्टेशन पार केले होते. कर्मऱ्यांनी डाबकी रोड गेटजवळ लाल झेंडा दाखवत गाडी थांबविली. ही गाडी अकोला रेल्वे स्थानकापर्यंत पोचली असती तरी मोठा अनर्थ घडण्याची शक्‍यता होती.

Web Title: Broken Railway Rule Mumbai Hawada Express