भरधाव एसटीत होते विद्यार्थी आणि तुटला स्टिअरिंगचा रॉड

निलेश बढे
शनिवार, 4 जानेवारी 2020

कोथळी (जिल्हा बुलडाणा) : कोथळी मोताळा मार्गावर साई पॅलेस जवळील नालाच्या काठावर बसचा रॉड तुटल्याने बस रस्ताच्या कडेला शेताच्या बांधावर जाऊन धडकली ड्रायव्हरने दाखवलेल्या प्रसंगसावधनामुळे बस मधून प्रवास करीत असलेले 45 प्रवाशी सुखरूप वाचले. त्यापैकी 23 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोथळी (जिल्हा बुलडाणा) : कोथळी मोताळा मार्गावर साई पॅलेस जवळील नालाच्या काठावर बसचा रॉड तुटल्याने बस रस्ताच्या कडेला शेताच्या बांधावर जाऊन धडकली ड्रायव्हरने दाखवलेल्या प्रसंगसावधनामुळे बस मधून प्रवास करीत असलेले 45 प्रवाशी सुखरूप वाचले. त्यापैकी 23 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चिंचखेड-मोताळा मलकापूर आगाराची बस क्र ही सकाळी 9 च्या सुमारास शाळेतील विद्यार्थ्यांसह प्रवाशांना घेऊन मोताळाकडे जात असताना कोथळी जवळच या बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस अनियंत्रित झाली. यावेळी ड्रायव्हर यांनी प्रसंगावधान राखत बस रस्ताच्या कडेला असलेल्या शेताच्या बांधावर चढवली यामुळे बस नियंत्रित होऊन मातीत रुतल्याने बंद पडली,यामुळे सर्व प्रवाशी बाल बाल बचावले आणि मोठा अनर्थ टळला.
हेही वाचा - ... तरीही फुलविली एचटीबीटी!

Image may contain: outdoor

भंगार बस रोडवर धावतात कशा?
या अपघाताच्या निमित्ताने पुन्हा एकदा नादुरुस्त बसेसच्या प्रश्न पुढे आला आहे एसटी महामंडळ विनादेखभाल अशा बसेस रोडवर चालवून एसटी कर्मचारी व प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याचे अशा घटनांमधून दिसून येत आहे.

हेही वाचा - दिग्गजांची लागणार कसोटी

Image may contain: sky and outdoor
 

एसटी बसच्या धडकेत दिव्यांग शिक्षकाचा मृत्यू
रस्त्यांवर अपघात झाला नाही, असा एकही दिवस जात नाही. दररोज मोठ्या संख्येने रस्त्यांवर येणारी वाहने अपघातांना कारणीभूत असली, तरी त्यामागील मानवी चुका हे प्रमुख कारण आहे. केवळ रस्त्यांवरून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांच्या अपघातांमध्ये वाढ होत आहे असे नाही; तर पादचारी आणि सायकलस्वारांनाही याचा फटका बसत आहे.
आज तर कहरच झाला. पुतणीला शाळेत भेटण्यासाठी जाणाऱ्या रोहणा येथील एका दिव्यांग संगीत विषयाच्या शिक्षकावर काळाने आज घाला घातला. समोरून भरधाव एसटीने त्यांच्या तीनचाकी मोटारसायकलला धडक दिल्याने शिक्षकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना खामगाव-बुलडाणा मार्गावरील रोहणा फाट्याजवळ घडली.
रोहणा येथील रहिवासी संगित शिक्षक पद्मनाभन नारायण बोचरे (वय 40) हे आज त्यांच्या पुतणीच्या शाळेत एका कार्यक्रमासाठी त्यांची तीनचाकी मोटारसायकल क्रमांक एम. एच. 28 एएल 0964 वरून नांदुराकडे जात होते. त्याचवेळी बुलडाण्याकडून खामगावकडे भरधाव वेगात येणारी अकोला डेपोची बस क्रमांक एम. एच. 06 एस 8905 ने रोहणा फाट्याजवळील आरोग्य केंद्रासमोर शिक्षक बोचरे यांच्या तीनचाकी मोटारसायकलला जोरदार धडक देऊन त्यांना चाकाखाली चिरडले. या अपघातात शिक्षक बोचरे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसही तातडीने अपघातस्थळी पोहोचले. यावेळी पोलिसांनी सदर बसचा चालक दिनेश प्रल्हाद विरघट (वय 39) रा. अकोला यास ताब्यात घेतले आहे. वृत्त लिहेपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Broken steering of student carrying ST in buldana