आईला घराबाहेर काढणाऱ्या भावाचा खून 

अनिल कांबळे
मंगळवार, 26 जून 2018

नागपूर : वृद्ध आईला घरातून बाहेर काढणाऱ्या दारूड्या भावाचा लहान भावाने डोक्‍यात कडप्पा घालून खून केला. ही थरारक घटना आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास गणेशपेठ परिसरात उघडकीस आली. या प्रकरणी लहान भावाला पोलिसांनी अटक केली. नीरज पालेश्‍वर विंचूरकर (वय 30, मॉडेल मील चौक) असे आरोपीचे नाव आहे. तर पंकज विचूरकर (वय 40) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. 

पंकज हा बेरोजगार होता तसेच त्याला दारूचे व्यसन होते. तर आरोपी नीरज हा कॅपिटल फायनान्स कंपनीत लोन एक्‍झिकेटीव्ह आहे. तो नेहमी घरी आल्यानंतर आई आणि भावाशी दारूच्या पैशावरून भांडण करीत होता. तो दारूच्या नशेत आईला मारहाण करीत होता. त्याची समजूत घालून त्याला शांत करण्यात येत होते. सोमवारी पंकज दारू पिऊन घरी आला. त्याने आईला दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे नसल्याचे ती गप्प होती. दारू पिण्यास पैसे न दिल्यामुळे त्याने आईला मारहाण केली आणि घरातून बाहेर काढले.

वृद्ध आई रडत-रडत घराबाहेर पडली आणि खरबी-पारडीत राहणाऱ्या मोठ्या सूनेच्या घरी निघून गेली. नीरज हा मध्यरात्रीच्या सुमारास कामावरून घरी आला. त्याने घरमालकाला आईबाबत विचारणा केली. आईला मारहाण करून घरातून हाकलून दिल्याची माहिती नीरजला दिली. त्यामुळे त्याचा पारा चढला. त्याने रागाच्या भरात घरात झोपलेल्या भावाच्या डोक्‍यात घरात पडलेला कडप्पा घातला. यातच पंकजचा जागीच मृत्यू झाला. आवाजाने घरमालक जागे झाले. त्यांनी गणेशपेठ पोलिसांना फोन केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली.

Web Title: brother killed for mother get outside from house