बहिणीची छेडखानी केली म्हणून भावाने केला खून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

बहिणीची छेडखानी करणाऱ्या एका युवकाचा भावाने डोक्‍यावर डोक्‍यावर लोखंडी गंज मारून खून केला. ही घटना नंदनवन झोपडपट्टी परिसरात 6 ऑगस्टला घडली असून शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. हेमंत रामभाऊ खडसे (20, रा. गल्ली क्रमांक 13, नंदनवन झोपडपट्टी) असे आरोपीचे नाव आहे.

नागपूर ः बहिणीची छेडखानी करणाऱ्या एका युवकाचा भावाने डोक्‍यावर डोक्‍यावर लोखंडी गज मारून खून केला. ही घटना नंदनवन झोपडपट्टी परिसरात 6 ऑगस्टला घडली असून शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. हेमंत रामभाऊ खडसे (20, रा. गल्ली क्रमांक 13, नंदनवन झोपडपट्टी) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेंद्र मारोतराव गुज्जनवार (40, रा. नंदनवन झोपडपट्टी) असे मृताचे नाव आहे. शैलेंद्र हा अविवाहित होता व एकटाच राहायचा. त्याला दारूचे व्यसन होते. आरोपीची बहिण विवाहित असून काही दिवसांपूर्वीच ती माहेरी आली होती. गेल्या 6 ऑगस्टला शैलेंद्र त्यांच्या घरी गेला व त्याने आरोपीच्या बहिणीची छेड काढली. त्यानंतर तो निघून गेला. बहिणीने आपल्याला भावाला घडलेला प्रकार सांगितला.

संध्याकाळच्या सुमारास आरोपी हा शैलेंद्रला जाब विचारण्यासाठी त्याच्या घरासमोर गेला असता त्याने रस्त्यावर न बोलता आतमध्ये बसून बोलण्याची विनंती केली. शैलेंद्रसोबत हेमंत हा त्याच्या घरी गेला. यावेळी दोघांमध्ये वाद झाला व आरोपीने स्वयंपाकाच्या गंजाने त्याच्या डोक्‍यावर मारले व निघून गेला. यात तो रक्तबंबाळ झाला. त्यादरम्यान घराबाहेर निघाला. पण, रात्री त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालात त्याचा खून झाल्याचे स्पष्ट होताच परिसरात चौकशी करून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीने आपला गुन्हा कबुल केला. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांच्या मार्गदर्शनात खुनाचा गुन्हा दाखल आरोपीला पोलिसांनी अटक केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brother murder Due to sister molested from boy