'ईव्हीएम हटवा अन्यथा विधानसभा निवडणूक होवू देणार नाही'

श्रीधर ढगे
शनिवार, 1 जून 2019

लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत सकाळने वंचित बहुजन आघाडीची भूमिका जाणून घेतली.  त्यावेळी , अशोक सोनोने म्हणाले, बहूजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी यापूर्वीच ईव्हीएम ऐवजी  बेलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली होती.

खामगाव : लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आम्हाला मान्य नाही, ईव्हीएममध्ये घोळ करून भाजपाचा विजय झाला आहे असा गंभीर आरोप करत ईव्हीएम विरोधात भारिप बहूजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारिप आणि वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रभर सर्व जिल्ह्यात व तालुक्यात एकाच दिवशी आक्रमक आंदोलन करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी 'सकाळ' शी बोलतांना दिली. ईव्हीएम हटविल्या नाहीत तर  राज्यात विधानसभा निवडणूक होवू देणार नाही असा गर्भित ईशाराच अशोक सोनोने यांनी दिला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत सकाळने वंचित बहुजन आघाडीची भूमिका जाणून घेतली.  त्यावेळी , अशोक सोनोने म्हणाले, बहूजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी यापूर्वीच ईव्हीएम ऐवजी  बेलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली होती. लोकसभा निवडणुकीत लागलेल्या निकालाने नागरिकांचा ईव्हीएमवरचा विश्वासच उडाला आहे. अकोला, बुलडाणा येथे प्रत्यक्ष झालेले आणि मतमोजणी नंतरच्या मतदानात तफावत आहे, अनेक ठिकाणी असे प्रकार घडले आहेत.

त्यामुळेच आम्हाला लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव मान्य नाही. कोणताही पराभव हा शेवटचा पराभव नसतो. विधानसभा निवडणुकीत आम्हाला निश्चितच यश मिळेल असेही सोनोने म्हणाले. महाराष्ट्रभर लवकर ' ईव्हीएम हटाव, लोकशाही बचाव' असा नारा देत आक्रमक आंदोलन केल्या जाणार असून ईव्हीएम हटवल्या शिवाय राज्यात विधानसभा निवडणूक होवू देणार असा पवित्रा ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीने घेतला असल्याची माहिती अशोक सोनोने यांनी दिली आहे.

Web Title: BSP leader Ashok Sanone attack on EVM