esakal | बुलडाणा कोरोनाचा हॉटस्पॉट!
sakal

बोलून बातमी शोधा

Buldana Corona hotspot!

मरकज येथून परतलेल्या व्यक्‍तीच्या संपर्कात आलेल्या इतर नागरिकांच्या नमुन्याचे अहवाल 8 एप्रिलला प्राप्त झाले असून, यामध्ये तीन तर 9 एप्रिलला देऊळगावराजा व मलकापूर येथील प्रत्येकी एक व्यक्‍ती पॉझिटिव्ह आले आहे. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात पॉझिटिव्ह व्यक्‍तींची संख्या 17 वर पोहचली आहे.

बुलडाणा कोरोनाचा हॉटस्पॉट!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना व्हायरस आता हळूहळू पाय पसरत असून, याला मुख्यत्वे दिल्ली कनेक्‍शन कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. मरकज आणि त्या संपर्कातील व्यक्‍तींना कोरोना प्रादुर्भाव झाला असून, यामुळे आता विदर्भात बुलडाणा जिल्ह्यात कोरोना हॉटस्पॉट होते की काय असा संशय व्यक्‍त करण्यात येत असून, समुह संक्रमण रोखण्याचे प्रशासनासमोर मोठे आवाहन उभे राहिले आहे.

मरकज येथून परतलेल्या व्यक्‍तीच्या संपर्कात आलेल्या इतर नागरिकांच्या नमुन्याचे अहवाल 8 एप्रिलला प्राप्त झाले असून, यामध्ये तीन तर 9 एप्रिलला देऊळगावराजा व मलकापूर येथील प्रत्येकी एक व्यक्‍ती पॉझिटिव्ह आले आहे. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात पॉझिटिव्ह व्यक्‍तींची संख्या 17 वर पोहचली आहे.

प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्यानंतर दिल्ली कनेक्‍शनमुळे बुलडाणा बाधित झाल्याचे आता समोर येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 15 व्यक्‍ती बाधित झाले असून,त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. बाधित झालेल्या व्यक्‍तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्‍तींचे स्वॅब नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. जिल्ह्यात आज (ता.9) 1 संशयित व्यक्ती बुलडाणा आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात दाखल करण्यात आले आहे. 8 एप्रिलला संशयित व्यक्तींचे 44 नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी आज (ता.9) 30 नमुन्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून 27 निगेटिव्ह व 3 पॉझिटिव्ह आले आहे. आज (ता.9) प्रयोगशाळेत 13 नमुने तपासण्यासाठी पाठविण्यात आले आहे.

घरामध्ये विलगीकरण करण्यात आलेल्या नागरिकांमध्ये आज (ता.9) भर पडली नाही. त्यामुळे क्वारंटाईनच्या संख्येत आज (ता.9) वाढ नाही. 8 एप्रिलपर्यंत 86 भारतीय नागरिकांना त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. गृह विलगीकरणातून 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची आज मुक्तता करण्यात आली नाही. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 86 नागरिक होम क्वारंटाईन' करण्यात आले आहे.

 जिल्ह्यात संस्थात्मक विलगिकरणात आज (ता.9) एकूण 101 नागरिकांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. संस्थात्मक विलागिकरणातून आज (ता.9) 1 मुक्तता करण्यात आली. संस्थात्मक विलगीकरणात आज एकूण 101 नागरिक आहेत. आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात सध्या 25 व्यक्ती दाखल आहेत. त्यामध्ये खामगाव 5, शेगाव 9 व बुलडाणा 11 व्यक्तींचा समावेश आहे. घरीच स्वतंत्र खोलीत 14 दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या आजपर्यंत 67 नागरिकांची निरीक्षणातून मुक्तता करण्यात आली. तसेच संस्थात्मक विलगीकरणातून 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर आजपर्यंत 96 नागरिकांना निरीक्षणातून घरी सोडण्यात आले. तसेच सध्या जिल्ह्यातील 25 नागरिक आयसोलेशन कक्षात दाखल आहेत. अलगीकरणातून आजपर्यंत 30 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली असून यामध्ये बुलडाणा येथील 14, शेगाव 5 व खामगांव येथील 11 व्यक्तींचा समावेश आहे.

 तत्काळ तीन व्हेंटिलेटर झाले उपलब्ध
बुलडाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेली कोरोना बाधित व्यक्‍तींची शक्‍यता पाहता येथे केवळ एकच व्हेटीलेटरची व्यवस्था होती. दरम्यान, पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत नुकतीच झालेल्या व्हीडीओ कॉन्सफरसमध्ये 12 व्हेटीलेटरची तत्काळ मागणी केली होती. त्यापैकी केवळ दोनच दिवसात 3 व्हेटींलेटर प्राप्त झाले असून, उर्वरितही लवकरच प्राप्त होणार असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे.

 कोरोना जिल्हा तपशील 
आज (9 एप्रिल)
तपासणीसाठी पाठविलेले नमुने : 13
प्राप्त झालेले अहवाल : 30
पॉझिटिव्ह : 05
निगेटिव्ह : 27

 आजपर्यंत अहवाल 
एकूण पाठवलेले नमुने : 182
एकूण प्राप्त झालेले नमुने : 155
पॉझिटिव्ह व्यक्‍ती : 15
निगेटिव्ह व्यक्‍ती : 140
मृत झालेली व्यक्‍ती : 1
प्रतीक्षेत असलेले नमुने : 27

loading image