बुलडाणा : बैलाचा शॉक लागून मृत्यू 

पंजाबराव ठाकरे
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

येथील वीज कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे बैलाला शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी दहाच्या दरम्यान वानखेड शिवारात घडली. दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला.

संग्रामपुर : येथील महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे बैलाला शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी दहाच्या  दरम्यान वानखेड शिवारात घडली. दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला. दरम्यान, अर्थिंगच्या ताराला ताणाची फिटिंग असल्याने हि घटना घडली घटना. यामध्ये राजेंद्र देवमन हागे याचे ५० हजाराचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी गणेश हागे बैलगाडीमधून टोमॅटोची रोपे शेतात घेऊन जात होते. शेत रस्त्याने जात असताना बैलगाडीत गणेश हागे सोबत आणखी एक मजूर बसले होते. रस्त्याने जात असताना विजेच्या खांबाला असलेल्या ताणाला बैलाच्या शेपटीचा स्पर्श झाला आणि जुंपलेला बैल क्षणात खाली कोसळून मृत पावला.

त्या बैलाचा स्पर्श बंडीला झाला असता, तर मोठा अनर्थ घडला असता. अशी चर्चा घटनेनंतर सुरू आहेत. सदर वीज पोलास जो ताण दिलेला आहे. त्या तानाचा स्पर्श पोलवरील अर्थीगच्या ताराला होईल अशा रितीने फिटिंग केलेली आहे. यातूनच पाऊस पडलेला असल्याने या टेन्शन तारामध्ये विद्युत प्रवाह आल्याने ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Buldana: Death of bullock in shock