आदिवासी बहुल भागातील लेक नुयार्कमध्ये देत आहे वैद्यकीय सेवा

buldana girl providing health care in New York
buldana girl providing health care in New York

संग्रामपूर (जि.बुलडाणा) : आदिवासी बहुल बुलढाणा जिल्ह्यातील लेक कोरोना सारख्या महाभयंकर आजारा विरुद्ध नुयार्कमध्ये लढा देत आहे. कोरोना संदर्भातील रुग्णावर उपचार करीत असताना आपत्कालीन परिस्थितीवर दिवसभर काम करीत आहे.  

बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी आणि मागास असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील  डॉ. ट्विंकल चांडक ही युवती सद्यस्थितीत नुयार्क मधील एल.ए. मधील लाँग बीच हॉस्पिटलमध्ये  कोरोना कक्षात काम करीत आहे. या संदर्भात त्या महिला डाक्टर ने वेळात वेळ काढून ही माहिती भारतात असलेल्या आपल्या कुटुंबातील आप्तीयापर्यत  सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्याची माहिती मिळाली. 

डॉ. ट्विंकल चांडक यांनी के.एम.ई. हॉस्पिटल मुबई मधून एम.बी.बी.एस. पूर्ण केले.  अमेरिका मधील न्यू जर्सी येथील यू.एस. व एम.पी. चे मेडिसिन केले.  सध्या एल.ए. मधील लाँग बीच हॉस्पिटलमध्ये त्या काम करीत आहेत. या ठिकाणी सर्वत्र हाहाकार माजविलेल्या कोरोना सारख्या आजाराच्या रूग्णांवर त्या उपचार करत आहेत .आणि आपत्कालीन परिस्थितीवर दिवसभर काम करत आहेत. कोरोनाच्या बाबतीत आपल्या देशातील गावाची परिस्थिती कशी आहे याची त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कुटुंबियाकडून माहिती जाणून घेतल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com