संचारबंदीच्या काळातही दारू व्यवसायाला उधाण

buldana liquor business is on the rise even during the lockdown
buldana liquor business is on the rise even during the lockdown

मोताळा (जि.बुलडाणा): संचारबंदीच्या काळात देशी विदेशी मद्याच्या दुकानांना टाळे असल्याने अवैध दारू व्यवसायाला उधाण आले आहे. दरम्यान, बोराखेडी पोलिसांनी बेकायदेशीररीत्या दारू बाळगणार्‍यांना दणका दिला असून, विविध पाच ठिकाणी कारवाई करून 95 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोराखेडीचे पीआय माधवराव गरुड यांच्या नेतृत्वात बोराखेडी पोलिसांनी अवैधरीत्या दारूचा व्यवसाय करणार्‍यांविरुद्ध कारवाईची मोहीम उघडली आहे. पोलिसांनी शुक्रवारी भाडगणी शिवारातील अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा मारला असता, आरोपी अमोल विश्वनाथ शेळके (27, रा. भाडगणी) हा पोलिसांची चाहूल लागल्याने पळून गेला. पोलिसांनी याठिकाणी 90 लिटर मोहा सडवा, 10 लिटर हातभट्टी दारू व इतर साहित्य असा एकूण 11 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी शनिवारी सायंकाळी कोथळी येथे छापा मारला मारून आरोपी अमोल अशोक सातव (25, रा. कोथळी) याच्या ताब्यातून 8 नग देशी दारूच्या शिश्या व पिशवी असा 410 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यानंतर मोताळा-खरबडी मार्गावर सापळा रचला असता, दिलीप तुळशीराम जमाव (40, रा. कोथळी) हा दुचाकीवर अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक करताना मिळून आला. 

पोलिसांनी त्याच्या ताब्यातून देशी दारूच्या 120 शिश्या (किंमत 10800 रुपये), एक पोतडी व शाईन दुचाकी एम.एच. 28 बी.जी. 5470 (किंमत 50 हजार) असा एकूण 60 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शनिवारी सायंकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास तालखेड येथे छापा मारून आरोपी बाळकृष्ण उर्फ बाळू केशव दोडे (35, रा. तालखेड) याच्या जनावरांच्या गोठ्यातून 4 लिटर हातभट्टी दारू व प्लास्टिक कॅन असा 420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर, रविवारी टाकरखेड येथे सापळा रचून आरोपी बाळू केशव दोडे (35 रा. तालखेड) याला पुुन्हा अवैधरीत्या दारू वाहतूक करताना पकडण्यात आले. त्याच्या ताब्यातून 30 लिटर हातभट्टी दारू (किंमत 2700 रुपये), प्लास्टिक कॅन (100 रुपये), बजाज दुचाकी एम.एच. 28 एन. 1746 (किंमत 20 हजार) असा एकूण 22 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी उपरोक्त चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे समजपत्र देऊन सोडण्यात आले. सदर कारवाई ठाणेदार श्री गरुड यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अशोक रोकडे, एपीआय राहुल जंजाळ, एएसआय विनोद शिंदे, नंदकिशोर धांडे, राजेश वानखेडे, गजानन वाघ, मिलींद सोनोने, नापोकाँ सय्यद, पोकाँ सुनील थोरात, दामोदर लठाड, सुनील भवटे, शिवाजी मोरे, मंगेश पाटील, गणेश बरडे व सहकार्‍यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com