esakal | Video: कोरोनाची नियमावली पाळून आमदार पुत्र आणि कन्येचा विवाह सोहळा साधेपणात 
sakal

बोलून बातमी शोधा

buldana mla daughter wedding in corona days

बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांची कन्या रोहिणी व सुपुत्र मृत्युंजय गायकवाड यांचा विवाह सोहळा कोरोना च्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने व सर्व नियम पाळून साध्या पद्धतीने पार पडला. 

Video: कोरोनाची नियमावली पाळून आमदार पुत्र आणि कन्येचा विवाह सोहळा साधेपणात 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बुलढाणा :  बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांची कन्या रोहिणी व सुपुत्र मृत्युंजय गायकवाड यांचा विवाह सोहळा कोरोना च्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने व सर्व नियम पाळून साध्या पद्धतीने पार पडला. 


 आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा मृत्यूंजय याचा विवाह वरवंड येथील मयूरी भागवत जेऊघाले हिच्यासोबत ठरला होता. तसेच आमदारांची कन्या रोहिणी हिचा विवाह  किन्होळा येथील गणेश बाहेकर यांचा मुलगा मयूर यांच्यासोबत गेल्या काही महिन्यांपूर्वीच ठरला होता. एप्रिल महिन्यात विवाहाचा मुहूर्त काढण्याचे ठरले होते. मुलीच्या साखरपुड्याचा कार्यक्रमही बुलडाण्यात धुमधडाक्यात तीन महिन्यांपूर्वी  झाला होता.  मात्र नंतरच्या काळात कोरोनाने जिल्हाभर नव्हे तर जगभर आपले हातपाय पसरले आणि सर्वच समारंभ रद्द झाले.


 त्या पार्श्वभूमीवर आमदार गायकवाड यांनी आपल्याकडे विवाह सोहळा देखील अत्यंत साधेपणाने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आणि सध्याच्या पार्श्‍वभूमीवर सॅनेटायझर, मास्क आदींचा वापर करून साजरा करण्यात आला. मुलगी रोहिणी हिचा विवाह गणेश बाहेकर यांचे चिरंजीव मयुर यांच्यासोबत दोन्ही परिवारातील मोजक्या वऱ्हाडी मंडळीच्या उपस्थितीत दुपारी दोन वाजता श्री गायकवाड यांच्या निवासस्थानी साध्या पद्धतीने पार पडला. 
 चिरंजीव मृत्युंजय याचा विवाह मयुरी भागवत जेऊघाले यांच्याशी सकाळी दहा वाजता वरवंड येथील एका शेतामध्ये अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. या महामारीच्या पार्श्वभूमीवर समाजासमोर एक आदर्श घालून देण्यासाठी आपण स्वतःपासून सुरुवात केली व अतिशय साध्या पद्धतीने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा साजरा करून लाखो रुपयांच्या खर्चाला फाटा दिल्याचे श्री गायकवाड यांनी सांगितले.

loading image
go to top