Buldana MP Prataprao Jadhav Shiv Sena District Chief Baliram Mapari
Buldana MP Prataprao Jadhav Shiv Sena District Chief Baliram Mapari

बुलडाणा : मी शेवटच्या श्वासापर्यंत खासदारांसोबतच

प्रा.बळिराम मापारी; लोणार येथे पत्रकार परिषदेतून शिंदे गटात असल्याचे संकेत

लोणार : मी राजकारणाची सुरवात खासदार प्रतापराव जाधव यांचे बोट धरून केली असून राजकारणाचा शेवटही त्यांच्यासोबतच करणार असल्याचे मनोगत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. बळिराम मापारी यांनी व्यक्त केले.

माझा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला असून माझ्या घराला कुठलाही राजकीय वारसा नसताना खासदार प्रतापराव जाधव यांनी गेल्या तीस वर्षापासून अनेक पदावर काम करण्याची संधी दिली. त्यात तालुकाप्रमुख, नगरसेवक, नगराध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, जिल्हा नियोजन समिती सदस्य, जिल्हा बँकेवर संचालक तसेच अनेक अशासकीय समित्या व जिल्हाप्रमुख म्हणून काम करण्याची संधी दिली. राजकारणात अनेक पदावर काम करण्याची संधी खासदार जाधव व आमदार संजय रायमुलकर यांच्यामुळे मिळाली.

राजकारणामध्ये जी अनेक पदे व जिल्ह्यात माझी ओळख झाले व मी नावारूपास आलो तो खासदार जाधव यांच्यामुळे. ते माझे राजकीय गुरू असून त्यांना सोडून जाणे अशक्य आहे. मेहकर येथे खासदार जाधव व आमदार रायमुलकर यांनी बोलावलेल्या सभेला उपस्थित राहू शकलो नाही कारण मी कोल्हापूर व तुळजापूरला दर्शनासाठी गेलो होतो. परंतु, सभेला उपस्थित नसल्यामुळे माझ्याविषयी अनेक शंका घेण्यात आल्या.

मात्र मी तसा निरोप खासदार जाधव यांना दिला होता. परंतु माझी निष्ठा ही खासदार जाधव व आमदार रायमुलकर यांच्या सोबतच आहे. गेल्या तीस वर्षापासून त्यांच्यासोबत काम करत असताना त्यांनी मला कुटुंबातील सदस्य प्रमाणे वागणूक देत माझा एकही शब्द खाली पडू दिला नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी त्यांच्यासोबत राहावे असे आवाहनही यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. बळिराम मापारी यांनी त्यांच्या निवासस्थानी खासदार जाधव व आमदार रायमुलकर यांनी भेट दिली असता त्या ठिकाणी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत मत व्यक्त केले.

पत्रकार परिषदेला खा.प्रतापराव जाधव, आ.डॉ.संजय रायमुलकर, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.बळिराम मापारी, नगरसेवक डॉ. अनिल मापारी, युवासेना तालुकाध्यक्ष गजानन मापारी, बाजार समिती संचालक विठ्ठल घायाळ, टिटवी सरपंच भगवानराव कोकाटे, रौनक अली, समाधान राठोड, राहुल मापारी, तुकाराम डोळे, धोंडू राठोड आदी उपस्थित होते.

प्रा. मापारी हे माझ्या कुटुंबातील सदस्य : खा.जाधव

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. बळिराम मापारी हे गेल्या तीस वर्षापासून माझ्यासोबत एक निष्ठेने पक्षाचे काम करत असून ते माझ्या कुटुंबातील सदस्य आहे. सलग पंचवीस वर्ष शिवसेनेचे तालुकाप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिली. जिल्ह्यात सर्वाधिक कालावधीसाठी तालुकाप्रमुख म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांना विचारल्याशिवाय तालुक्यातील एकही निर्णय मी घेतला नाही. संघटनेमध्ये कोणाला पद द्यायचे, बाजार समिती, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सर्व निवडणुकांमध्ये त्यांना विचारल्याशिवाय उमेदवारी देण्यात आली नाही. त्यांचा प्रत्येक शब्द झेलण्याची काम मी केले त्यांची वक्तृत्व शैली आक्रमक बाणा नेतृत्व गुण पक्षासाठी संघटनेसाठी झोकून देण्याची प्रवृत्ती पाहून मी त्यांना जिल्हाप्रमुख म्हणून काम करण्याची मागील दोन वर्षापासून संधी दिली. प्रा.मापारी व माझे राजकारणाच्या पलीकडील संबंध असून ते मला माझ्या कुटुंबातील सदस्य प्रमाणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com