Buldana : आगामी निवडणुकांत गद्दारांना धडा शिकवा

शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्‍यात विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचे प्रतिपादन
Buldana
Buldana sakal

Buldana : आगामी निवडणुकांत गद्दारांना धडा शिकवा

शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्‍यात विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचे प्रतिपादन

Buldana shiv sena Opposition leader Ambadas Danve municipality Zilla Parishad, Gram Panchayat Election

बुलडाणा : आगामी काळ हा संघर्षाचा आहे. नगरपालिका, जिल्हा परीषद, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी संघटनात्मक बुथ तयार करून हिमंतीने शिवसेना पक्षाची बांधणी करा निवडणुका जिंकून गद्दारांना धडा शिकवा. पोलिसांनी सत्ताधाऱ्यांच्या ताटा खालचे मांजर बनू नका. राज्यातील शेतकरी, कामगार, रोजगारांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास सरकारच्या मंत्र्याना वेळ नाही असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

येथील गर्दे वाचनालय सभागृहात आज दि. १६ सप्टेंबर रोजी दुपारी जाहीर सत्कार व शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अंबादास दानवे यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख जालीधर बुधवंत, वसतराव भालेराव, संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, दत्ता पाटील, छगन मेहेत्रे महिला आघाडीच्या जिल्हाअध्यक्ष चंदा बढे, संजय हाडे, लखन गाडेकर, हेमंत खेडेकर यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.

अंबादास दानवे यांनी केद्र व राज्य सरकावर टिका करतांना एक लाख बेरोजगाराना रोजगार देणारी वेदांत उद्योग गृप गुजरातमध्ये घेऊन गेले. उद्योग विभाग बंद पडण्याच्या मार्गावर आहे. महागाई पेट्रोल, तेल, खते, बियांणाचे भाव वाढेल राज्यात सत्तेत असणारे आमदार दादागीरी करीत असून अवैध धंदे वरली मटका जुगार खुले आम सुरु आहे. शेतमालाला भाव मिळतो काय, स्वामीनाथन आयोगानुसार भाव मिळत नाही. दहशतवादी सैनिकावर हल्ला करतात. रेल्वे विमानतळ दवाखना आरोग्य सुविधा मिळत नाही. जागतिक स्तराचे लोणार, मातृतिर्थ सिंदखेडराजा संत गजानन महाराजाचे शेगाव असलेल्या या जिल्ह्यात रेल्वे, विमानतळ पाहिजे. लोकप्रतिनिधीनी या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे. जनतेच्या समस्यांवर शिवसेना पक्ष रस्त्यावर येवून आंदोलन करेल, पन्नास खोके एकदम ओके हे आत जनतेला कळून चुकले त्यामुळे बैल पोळा, गणेश उत्सवात या वाक्यांचा देखावा सर्वदुर झाला हे खोके कुठे, किती आहेत आमदारच हळूहळू बाहेर काढतील राज्यात शेतकरी, कामगार बरोजगाराच्या प्रश्नावर शिवसेना सामान्य जनतेला न्याय मिळवून देईल, त्यासाठी संघटनात्मक कार्य करून गद्दाराना धडा शिकवा असे आवाहन दानवे यांनी केले.

जिल्हाप्रमुख जालीधर बुधवंत यांनी येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुकीत शिवसेना पक्षाचे नगराध्यक्ष आमदार, खासदार, होण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे शिवसेना संघर्षातून निर्माण झालेली आहे. यापूर्वी १९९० डॉ. राजेंद्र गोडे, कृष्णराज इंगळे पक्ष सोडून गेले परंतु शिवसेना संपली नाही. १९९५ ला पुन्हा सत्तेत आली. निष्ठावंत शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात निवडणूक जिकण्याची तयारी सुरु ठेवा असे त्यानी आवर्जून सांगितले.

संपर्क प्रमुख छगन मेहेत्रे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराच्या चून चूनके मारेंगे या आवाहनाला उत्तर देताना हिंमत असेल तर समोर या येणाऱ्या निवडणुकीत गद्दार बेईमान हरामखोरांना जनता तुमची जागा दाखविल्या शिवाय शांत बसणार नाही. असे म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट सुरु झाला.जिल्हा प्रमुख दत्ता पाटील यांनी राज्यात सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत पालकमंत्री न दिल्याने विकास आराखडा रखडला असल्याचे सांगून अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाला लम्पी आजाराने जनावेर दगावत आहे. या प्रशासकडे लक्ष देण्यास सरकारला वेळ नाही. असे त्यांनी आर्वजुन सांगितले.

महिला आघाडीच्या जिल्हाअध्यक्षा चंदा बढे यांनी खासदार प्रतापराव जाधव यांना संपर्क प्रमुख करण्यासाठी आम्ही उध्दव ठाकरेची गाडी अडविली त्यांना पक्षात काम करतांना सपूंर्ण जिल्हा हातात ठेवून राजकारण कारायचे होते, आता कुठे गेला असा प्रश्न करीत पुढचे खासदार नरूभाऊ खेडेकर, आमदार बुधवत भाऊ होतील असे घोषित करून गद्दारांनी किती संपत्ती जमविली त्याचा हिशोब घेण्याची वेळ आली असल्याचे सांगितले.

संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी चौफर फटके बाजी करून विदर्भातील संजय नावाचे गद्दार आमदार पक्ष सोडून निघुन गेले. गद्दार शब्दाला पर्यायी शब्द कोणता ते सुचवा, कार्यक्रमात खुर्च्या फेकून हाणामारी करणारे आज का आले नाही. अंबादास दानवेचा पायगुण चांगला आहे.

आमदार शांत झाले. आमचा कार्यक्रम उधळून लावतांना पोलिस प्रशासनाने अदखल पात्र प्रकरण करून धुडगुस घालणाऱ्यांना मदत केली. पोलिस खात्याची गुप्हेतर कुठे गेले हाते? असा प्रश्न उपस्थित वरून त्यांनी पक्षाच्या भट्या बदलविणारे यापुढे प्रतापगडावर नाही रायगडावर पक्षाचे कार्य होणार असे म्हणताच सभागृहात खसखस पिकली. कार्यकर्ता मेळाव्यात सभागृहाबाहेर शिवसेनिकांच्या गर्दीझाली होती. त्यांचेसाठी व्हिडीओ स्क्रिन लावण्यात आला. प्रास्ताविक लखन गाडेकर, अशोक इंगळे तर सूत्रसंचालन गजानन धांडे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com