अबब! एकाच ठिकाणी निघाले तब्बल 132 साप, मग पहा काय झाले

सकाळ वृत्तसेेवा
शनिवार, 2 मे 2020

जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे खोदकाम करताना तब्बल 132 साप आढळून आले आहे. अचानक निघालेल्या सापांमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. 
 

 

पिंपळगाव काळे (जि.बुलडाणा) :  जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे खोदकाम करताना तब्बल 132 साप आढळून आले आहे. अचानक निघालेल्या सापांमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. 

याबाबत प्राप्‍त माहितीनुसार ३० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता येथील ग्रामपंचायतच्या नालीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी चार ते पाच साप असल्याचे काही तरुणांच्या निदर्शनास आले होते. मात्र, त्या तरुणांनी सापांना मारून टाकले. मात्र थोड्या वेळातच काही व्यक्तींना आणखी साप आढळून आले. तेवढ्यातच गर्दी जमून उपस्थित नागरिकांनी ग्रामपंचायतच्या नालीचे बांधकाम खोदायला सुरुवात केली असता एकापाठोपाठ ३० ते ४० साप आढळून आले. त्यानंतर १ मे सायंकाळी ७ वाजेपर्यंत एकूण तब्बल १३२ साप आढळून आले. तर धक्कादायक म्हणजे गावामध्ये सर्पमित्र उपस्थित नसल्याने भितीपोटी या सर्व सापांना गावातील नागरिकांनी मारून टाकले आहे. या घटनेमुळे गावात भितीचे वातावरण आहे.

साप म्हटलं की कोणाच्याही पोटात गोळा येईल. साप चावल्यास मनुष्य मरतोच, या गैरसमजातून सापांना मारलं जातं. परंतु सापांचे निसर्गातील स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतीय संस्कृतीत सर्पांना देवांचे स्थान असून, नागपंचमीला नागाची मनोभावे पूजा केली जाते. पण प्रत्यक्षात घरात, परिसरात आदी ठिकाणी कोणत्याही जातीचा साप आढळल्यास नागरिकांकडून त्याची हत्या केली जाते हे ही मात्र तितकंच खरं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Buldana shocking132 snakes were in buldhana villagers have killed all snakes