राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत बुलडाणा संघाचा डबल धमाका

softboll tournament.jpeg
softboll tournament.jpeg

मलकापूर (जि.बुलडाणा) : येथील भाऊ टेनिस क्लब गौरीशंकर व्यायाम शाळेच्या क्रीडांगणवर आयोजित स्व. वसंताभाऊ सावजी मेमोरियल 6 वी महाराष्ट्र राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचा (ता.24) बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या स्पर्धेत बुलडाणा संघाने डबल धमाका उडवित कास्यपदकावर आपले नाव कोरले.

सॉफ्ट टेनिस असोसिएशन बुलडाणा व स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूर व भाऊ टेनिस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ता.22 ते 24 जानेवारी दरम्यान सॉफ्ट टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा 24 जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. या स्पर्धेचे बक्षीस वितरणाचे प्रमुख अतिथी म्हणून संतोष बोरगावकर, अध्यक्ष सॉफ्ट टेनिस असो राजेश महाजन कायर्ध्याक्ष रवींद्र सोनवणे सहसचिव महाराष्ट्र सॉफ्ट टेनिस असोसिएशन, नारायण बातुले अकोला जिल्हा सचिव, अशोक राजदेव, दीपक आरडे, रविभाऊ सोमण, राजेश्वर खगार, ठाकूर आदींची उपस्थित होती.

असा आहे महाराष्ट्र संघ
या स्पर्धेतून महाराष्ट्र संघ निवडला असून, हा संघ 5 ते 9 फेब्रुवारी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या संघात परम शहा (मुंबई), स्वराज भिसे (उस्मानाबाद), रोहित पाटील (जळगाव), प्रविणकुमा कुंभारे (जळगाव), आरड गडा (मुंबई), विष्णू कुंभार (जळगाव), विस्वराज इंगवले (पुणे), करण खंडागळे (उस्मानाबाद), परम मुधडा (बुलडाणा), तर मुलींमध्ये आयुशा इंगवले (पुणे), निशिका वाघेला (मुंबई), राजश्री पाटील (जळगाव), ताणशा शेट्टी (मुंबई), सँहेल पाटील (जळगाव), नेहा केळकर (मुंबई), आकांशा पाटील (जळगाव), आयटी दांडगे (पुणे), तसेच प्रशिक्षक म्हणून अमोल पाटील (जळगाव), संघ व्यवस्थापक विजय पळसकर (बुलडाणा) राहणार आहे.

विदर्भातून प्रथमच स्पर्धा घेण्याची संधी
सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असो बुलडाणा व स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूच्या माध्यमातून मलकापूर शहरात आजयगत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, विदर्भातून ही स्पर्धा घेण्याची संधी प्रथमच बुलडाणा जिल्हा संघटनेला देण्यात आली होती. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सॉफ्ट टेनिस असोचे सचिव विजय पळसकर, डॉ. राहुल चोपडे, अनिकेत चांडक, निलेश महाजन, विनय देवळे, प्रा. नितीन भुजबळ, अविनाश जगताप, नंदकिशोर कोठारी यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com