
बुलडाणा : मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची वाढली चिंता
भडगाव : बुलडाणा तालुक्यातील भडगाव शिवारात ४ जुलैला रात्री ८ वाजेपासून सुरू झालेला पाऊस सतत कोसळत असल्याने शेतकर्यांची चिंता वाढली असून, बियाणे अंकुरीत होण्याआधीच वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
गेल्या तीन वर्षांत अवकाळी पावसामुळे लाखो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे गतवर्षी ऐन डिसेंबर महिन्यात पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे शेतकरी अगोदरच मेटाकुटीला गेला आहे. त्यातच यावर्षी सुरवातीलाच मुसळधार पाऊस झाल्याने सोयाबीन शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन काही शेतकर्यावर दुबारा पेरणीचे संकट देखील निर्माण झाले आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकर्यांचे शेतीचे बांध फुटून पाणी थेट शेतात घुसल्याने नुकतेच मशागत करून सोयाबीन, तूर, मुंग, उडीद व इतर पिकाची पेरणी केली होती.
ती देखील काही प्रमाणात वाहून गेली आहे तर काही शेतात वाहून गेलेल्या मातीचे ढिगार तयार झाले आहे तर काही ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळे नाले तयार झाल्याने शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आता पुन्हा केव्हा शेताची दुरुस्ती करणार आणि नंतर केव्हा शेताची मशागत करून दुबारा पेरणी करणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अगोदरच कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये शेतकर्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागले त्यात पहिल्याच पावसाने शेतकर्याच्या तोंडचे पाणी पळाले.
पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने शेतकर्याने वर्गणी गोळा करून शेत रस्त्यामध्ये पाइप टाकले होते तेपण सुद्धा पाण्याबरोबर वाहून गेले. त्यामूळे शेतकरी आपला रस्ता शोधत असल्याचे चित्र दिसत आहे. रस्ता वाहून गेल्यामुळे शेतकरी तूर्तास अडचणीत आले आहे. सिंचन तलावात मात्र ५५ ते ६० टक्के पाणी साठा झाला असून पाणी पिण्याचा प्रश्न सुटला आहे. त्याच तलावात पाणी पुरवठा विहीर आहे. महसूल व कृषी विभागाणे सर्व्हे करून शेतकर्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गात जोर धरत आहे.
शेतकर्यांना रस्त्याची समस्या
सदर परिस्थितीबाबत शेतकर्यांनी समस्या मांडत, आमची शेती काही प्रमाणात वाहून गेली आहे. नाला, बंधारे फुटले आहे. रस्ता वाहून गेला आहे. सध्या शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. तर कृषी विभागाच्या वतीने कार्यालयातून माहिती आल्यास आम्ही तलाठी संयुक्त सर्व्हे करण्यात येतील असे सांगण्यात आले.
Web Title: Buldana Weather Updates Monsoon Heavy Rains Road Damage Farmer Concern
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..