अण्णाभाऊंच्या साहित्यावर रशियन दुतावासात परिषद

अण्णाभाऊ साठे
अण्णाभाऊ साठे

शेगाव (बुलडाणा) : ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून, कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे, असं जळजळीत सत्य आपल्या साहित्यातून मांडणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर पहिली आंतरराष्टीय शैक्षणिक परिषद 4 अॉक्टोबर रोजी मुंबईतील रशियन दूतावासात आयोजित करण्यात आली आहे.

अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याने माणसाच्या जगण्यासाठी प्रेरणा दिली असून या साहित्यातून सामान्य माणसाच्या श्रमाचे आणि त्याच्या घामाचे कौतुक केले आहे. अण्णाभाऊंच्या साहित्याची नोंद राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली आहे. अण्णाभाऊंनी रशियातील कर्तृत्ववान माणूस त्याच जगणं आणि त्यांनी आपल्या देशाप्रती दाखविलेली निष्ठा आणि अण्णाभाऊंच साहित्य आणि त्यांचे मोठेपण या सर्व बाबींवर चर्चा व्हावी यासाठी अनेकजणांनी विविध पातळ्यांवर आजपर्यंत प्रयत्न केले आहेत, करीत आहेत.

मुंबई येथील आचार्य आणि मराठे महाविद्यालय, चेंबुर येथील उपप्राचार्य आणि इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. बी. एन. गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून पी. एचडी. संपादन केली असून पोस्ट डॉक्टरेट अमेरिकेतील फ्लोरिडा या जागतिक नामवंत विद्यापीठातून पोस्ट डॉक्टरेट संपादन केले आहे.
अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर रशियन दुतावासात आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक चर्चा व्हावी यासाठी डॉ. बी. एन. गायकवाड सर गेल्या दीड वर्षापासून प्रयत्न करत होते. ह्याबद्दलची कल्पना प्रथम MGD चे मार्गदर्शक सुनील वारे यांना सांगितली. आणि इतर काही सहकाऱ्यांच्या सततच्या रशियन दुतावावासाकडील पाठपुराव्यातून रशियन सेंटर फाँर सायंन्स अँड कल्चर आणि MGD मिशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर ४ आँक्टोबर रोजी पहिली आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषद आयोजित केली. या परिषदेत केवळ अण्णाभाऊंचे साहित्य आणि त्यांचे कर्तृत्व या संदर्भातच या परिषदेत चर्चा होणार आहे.

ही परिषद यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या समित्या गठित केल्या असून परिषदेचे नियोजन डॉ. बी. एन. गायकवाड, सुनिल वारे सतिश कसबे, अमित गोरखे, सुदाम धुपे, राजू गायकवाड, पञकार गोविंद तुपे, अविनाश कांबीकर यांच्यासह मुंबईतील MGD परिवारातील सदस्य, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते आदी परिश्रम घेत आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com