काँग्रेस नेते संजय ठाकरे पाटील यांचे दिल्लीत निधन

श्रीधर ढगे
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

ते व त्यांच्या पत्नी सीमाताई ठाकरे जिल्हा परिषद सदस्य राहिल्या आहेत. त्यांनी पाणी पुरवठा योजनातील भ्रष्टाचार उघडकीस आणला. सकल मराठा समाजाला न्याय देण्यासाठी महाराष्ट्र मराठा सेवा संघटना सुरू केली होती.

खामगाव: माजी जिल्हा परिषद सदस्य, छत्रपती प्रतिष्ठाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र मराठा सेवा संघटनेचे संस्थापक संजय ठाकरे पाटील यांचे हृदय विकाराचा तीव्र धक्का आल्याने दिल्ली येथे गुरुवारी सायंकाळी निधन झाले. ही बातमी खामगाव येथे कळातच त्यांचा चाहत्यांवर दुःखाची छाया परसली.

संजय ठाकरे पाटील हे दिल्ली येथे गेले होते. त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली होती. त्याकरिता एका कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी ते काँग्रेसचे जेष्ठ नेते मुकुल वासनिक यांना निमंत्रण देण्याकरिता दिल्ली गेले होते. काँग्रेस मुख्यालय अकबर रोड नवी दिल्ली येथे वासनिक यांची भेट झाल्यावर ते महाराष्ट्र प्रभारी वाल्मिकी यांना भेटले. ही भेट आटोपून परत येताना त्यांना हृदय विकाराचा तीव्र धक्का आला. त्यांना दिल्लीतील राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये नेत असताना त्याचे निधन झाले. त्यांच पच्छात पत्नी, 2 मुले, सून व बराच मोठा आप्त परिवार आहे. बुलढाणा जिल्यातील ते एक महत्वाचे राजकिय प्रस्थ होते.

ते व त्यांच्या पत्नी सीमाताई ठाकरे जिल्हा परिषद सदस्य राहिल्या आहेत. त्यांनी पाणी पुरवठा योजनातील भ्रष्टाचार उघडकीस आणला. सकल मराठा समाजाला न्याय देण्यासाठी महाराष्ट्र मराठा सेवा संघटना सुरू केली होती. ते आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले होते. मात्र काळाने झडप घातल्याने त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहिले. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर खामगाव येथे शनीवारी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: buldhana marathi news congress leader sanjay thackeray dead