मलकापूर जवळ भीषण अपघात 3 ठार; 3 गंभीर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

अकोल्यातील राधास्वामी सत्संगासाठी जात होता तुलसानी परिवार

मलकापुर (जि. बुलडाणा) : धुळे येथून अकोला येथे आयोजित एका राधास्वामी सत्संग कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असलेल्या तुलसाणी परिवारावर काळाने घाला घातला. मालकापुर शहराजवळील तळसवाडा गावाजवळील हायवे क्रमणक ६ वर मारोती व्हॅगन आर आणि ट्रक मध्ये अमोरासमोर झालेल्या भीषण अपघातात कार मढी तुलसानी परिवारातील ३ जण जागीच ठार तर ३ जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. 21) रात्री ९.३० च्या सुमारास घडली. जखमींना अकोला येथे हलविण्यात आले.

धुळे येथून अकोला कडे जाणारी मारोती व्हॅगन आर कार क्रमांक एम एच 01 ऐ आर ४७०५ आणि अकोला कडून भुसावळ कडे भरधाव वेगाने जाणारा ट्रक क्रमणक जी जे 03 ऐ टी 2707मध्ये अमोरासमोर भाषण धडक झाली. या अपघातात मारोती व्हॅगन आर मोटारीचा चुराडा झाला. मोटारीमधून प्रवास करणाऱ्या धुळे येथील तुलसानी परिवारातील नवीन परसराम तुलसाणी (वय २२), सौ. रुमा महेशलाल तुलसाणी (वय ४०) आणि करिश्माला महेशलाल दुसेजा (वय २०) हे तिघे जागीच ठार झाले तर निशा तुलसाणी (वय ५०), जुही तुलसाणी (वय १३), भूमी तुलसाणी (वय १४) हे गंभीर रित्या जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती कळताच मलकापूरचे नगराध्यक्ष ऍड. हरीश रावळ, शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे, दसारखेड एमआईडीसी चे पो स्टे चे ठाणेदार माधव गरुड, आदींनी घटना स्थळा कडे तात्काळ धाव घेत जखमींना प्रथम मलकापूर येथील; रुग्णालयात व नंतर अकोला येथे हलविले आहे. अकोला येथे आयोजित एका राधास्वामी सत्संग कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असलेल्या तुलसाणी परिवारावर काळाने हा घाला घातला.

Web Title: buldhana news accident near malkapur 3 dead