आण्णा भाऊ साठे यांचे जागतीक दर्जाचे स्मारक मूंबईत होणार !

संजय सोनोने
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

शेगाव (जि. बुलडाणा): साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांचे जागतीक दर्जाचे स्मारक चेंबूर (चिरागनग) मुंबई येथे उभारण्यात येणार असून, त्याचा कृती आराखडा लवकरच शासनाला सादर करणार असल्याचे प्रतिपादन साहित्य सम्राट आण्णा भाऊ साठे स्मारक समीतीचे सदस्य सचिव व मातंग समाजाचे जेष्ठ नेते मधुकर कांबळे यांनी केले. शेगाव येथे आज (सोमवार) संत गजानन महाराज मंदीरात दर्शनासाठी कांबळे आले होते, यावेळी रेस्ट हाऊसला समाज बांधवाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी स्मारकाबाबत माहीती दिली.

मुंबई येथे आण्णा भाऊ साठे यांचे स्मारक व्हावे, अशी मागणी मातंग समाजाकडून होत होती. मुख्यमंत्री यांनी नुकतीच मुंबई येथे स्मारक समीतीची घोषणा केली असून मांतग समाजाचे मधुकर कांबळे यांची सदस्य सचिव (राज्य मंत्री पदाचा दर्जा) निवड केली, त्यानंतर ते प्रथमच शेगावात आले होते.

पुढे बोलतांनी श्री. कांबळे म्हणाले की, सदरचे स्मारक जागतीक दर्जाचे व्हावे या करीता कार्यकर्त्यांच्या संकल्पना विचारात घेऊन त्या ठिकाणी चार एकर जागेवर आण्णा भाऊंचा भव्य पुतळा, सभागृह, जागतीक दर्जाचे ग्रंथालय, मातंग समाजातील विद्यार्थ्यां करीता स्पर्धा परीक्षा केंद्र, कलाकार प्रशिक्षण केंद्र आदी सुविधा असतील. त्या ठिकाणी असलेल्या काही कुंटुबाचे पुनर्वस करण्यात येणार आहे, असेही कांबऴे यांनी सांगीतले.

यावेळी अनिल कांबळे गोपाल खंडारे सापूर्डा खंडारे आशिष सावळे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: buldhana news Anna Bhau Sathe's world-class memorial will be in Mumbai