भाजपला शह देण्यासाठी खामगाव काँग्रेसमध्ये खांदेपालट

Khamgaon
Khamgaon

खामगाव (बुलडाणा) : खामगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांची काँग्रेस कमिटीच्या प्रदेश प्रतिनिधीपदी नियुक्ती करण्यात आली असून, सोबतच तालुका, शहर अध्यक्ष व अन्य पदांवर नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या निमित्त बुधवारी येथील संत तुकाराम महाराज मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा घेवून सानंदा यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले.

खामगाव मतदारसंघात राणा दिलीपकुमार सानंदा तीन वेळा आमदार होते. गेल्या निवडणुकीत मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला. ऍड. आकाश फुंडकर हे आमदार बनले. केंद्र, राज्यात भाजपाची सत्ता आणि सानंदा याचे राजकीय विरोधक भाऊसाहेब फुंडकर याची कृषिमंत्रीपदी वर्णी लागली. त्यामुळे भाजपाला खामगाव मतदार संघात नवी उभारी मिळाली आणि सानंदा यांचा एकषत्री अंमल संपला. नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदमध्ये सानंदा यांना अपयश आले. सद्या कृषी उत्पन्न बाजार समिती ही एक संस्था काँग्रेसच्या ताब्यात आहे.

सत्ता गेल्यावर सानंदा यांना अडचणीत आणल्या गेले. जुनी प्रकरणे भाजपने बाहेर काढली. सानंदा यांना अटक प्रकरण चांगलेच गाजले. आपल्या विरोधात राजकीय षडयंत्र असल्याचे सांगुन सानंदा यांनी आरोप फेटाळून लावत दिल्ली गाठून जामीन मिळवला. अटक प्रकरण झाल्यावर सानंदा यांच्या प्रती सहानुभूती सुद्धा नागरिक वक्त करत होते. त्याचाही फायदा सानंदा घेतील. राजकारण म्हटले की चढउतार  नवीन येतातच. त्यामुळे अटक प्रकरणातून बाहेरून येत सानंदा पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठ सज्ज झाले आहेत. राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी सानंदा यांना सत्ता हवी आहे. त्यासाठी ते कामाला लागले असून खामगाव मतदार संघात त्यांनी संघटनेत मोठे फेरबदल केले आहेत. भाजपा विरोधात महागाईसह इतर कारणांनी जनतेत नाराजी असल्याने त्याचा फायदा घेण्यासाठी सानंदा रस्त्यावर उतरून आंदोलने करत आहेत.

खामगाव मतदार संघात काँग्रेसमधील कोणताही निर्णय हे दिलीपकुमार सांनंदा घेतात. त्यांना पक्षात आजवर कोणी प्रतिस्पर्धी नव्हता. आता मात्र आता मागील विधानसभा निवडणूकवेळी कॉंग्रेसमध्ये घरवापसी केलेले संजय ठाकरे पाटील विधानसभेची तयारी करत आहेत. त्यामुळे सानंदा यांनी सावध पवित्रा घेत संघटनेत आपली पकड आणखी मजबूत करायला सुरुवात केली आहे. "शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही" असे आपल्या खास स्टाईलमधे सांगत सानंदा आगामी विधानसभेवर दावा करत आहेत.

भाजपाने निवडणूकीत दिलेले एकही आश्वासन अद्यापही पूर्ण केलेले नसून काँग्रेसच्या जुन्या योजनांचे नाव बदलून त्या योजना पूर्ण करत आहे. हळूहळू लोकांना आपल्या हातून झालेली चुक लक्षात येत असून सत्ताधा­यांचा विरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. कमल का फुल ही जनतेची मोठी भूल ठरली आहे. आगामी प्रत्येक निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसची एक सक्षम टिम तयार करण्यात आली असून खामगाव मतदार संघात पुन्हा कॉंग्रेसचा झेंडा फडकेल.
- राणा दिलीपकुमार सानंदा, माजी आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com