आम्हाला वीज नको... 24 तास भारनियमन करा !

पंजाबराव ठाकरे
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

सौभाग्य नव्हे दुर्भाग्य!
सरकार सौभाग्य सारख्या योजना आणून मोफत वीज देण्याचे स्वप्न दाखवित आहे.मात्र नऊ ते दहा तास भारनियमन होत असल्याने आमचे जगणेच असह्य होत आहे.जिथे विकतची वीज नियमित मिळत नाही तेथे  मोफत वीज देणाऱ्या सौभाग्य योजनेची स्वप्ने दाखविली जातात हे आमचे दुर्भाग्य आहे अशी खंत यावेळी ग्रामस्थानी 'सकाळ' शी बोलताना व्यक्त केली.

संग्रामपूर (बुलडाणा) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवस आधीच सौभाग्य योजनेचा शुभारंभ करत हर घर बिजलीचा नारा दिला असला तरी ग्रामीण भागात मात्र भारनियमनाने त्रस्त झालेले नागरिक आता आम्हाला वीज नको असे म्हणत आहेत.संग्रामपुर तालुक्यातील वरवट बकाल येथील सरपंच व नागरिकांनी तसे निवेदन वीज विरतण कंपनीला दिले आहे.

वरवट बकाल हे संग्रामपुर तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेले मध्यवर्ती गाव आहे.गेल्या काही दिवसापासून या गावात वीज वितरणने नऊ ते दहा तास भारनियम सुरु केले.परिणामी आरोग्य सुविधा, व्यापार,व्यवसाय व शेतीची कामे प्रभावित होत आहेत.नऊ तासाचे भारनियमन होत असले तरी नागरिकांना वीज देयके मात्र अवाजवी येत आहेत. वीज विरतण कंपनीच्या अफलातून कारभाराला त्रस्त झालेल्या नागरिकानी अखेर वीज नको असा निर्णय घेतला आहे.24 तास  भारनियम करा अशा मागणीचे निवेदन वरवट बकाल येथील वीज वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंता यांना दिले आहे.या निवेदनावर सरपंच श्रीकृष्ण दातार ,प्रल्हाद दातार, गजानन ढगे, शेख अनिस, गोपाल इंगळे,संतोष इधोकार यांच्यासह नागरिकांच्या सह्या आहेत.

सौभाग्य नव्हे दुर्भाग्य!
सरकार सौभाग्य सारख्या योजना आणून मोफत वीज देण्याचे स्वप्न दाखवित आहे.मात्र नऊ ते दहा तास भारनियमन होत असल्याने आमचे जगणेच असह्य होत आहे.जिथे विकतची वीज नियमित मिळत नाही तेथे  मोफत वीज देणाऱ्या सौभाग्य योजनेची स्वप्ने दाखविली जातात हे आमचे दुर्भाग्य आहे अशी खंत यावेळी ग्रामस्थानी 'सकाळ' शी बोलताना व्यक्त केली.

Web Title: Buldhana news electricity in Sangrampur