अफवांवर विश्वास न ठेवता शांतता बाळगावी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

बुलडाणा पोलिस अधीक्षक यांचे आवाहन

खामगाव (बुलडाणा): भीमा कारेगाव तणाव निवळला असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता बाळगावी, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक शशिकुमार मीना यांनी केलं आहे.

बुलडाणा पोलिस अधीक्षक यांचे आवाहन

खामगाव (बुलडाणा): भीमा कारेगाव तणाव निवळला असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता बाळगावी, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक शशिकुमार मीना यांनी केलं आहे.

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा घटनेसंबंधाने पुणे-नगर रोडवर कोरेगाव भीमा फाट्यादरम्यान अज्ञात व्यक्तींकडून काही वाहनांवर दगडफेक करण्यात आली होती. या परिस्थितीमुळे पुणे जिल्हयातील महामार्गालगत तणावाचे वातावरण संपुर्णपणे पोलिस प्रशासनाचे वतीने शांत करण्यात आलेले असून, तणावपुर्ण परिस्थिती निवळली आहे. त्यामुळे त्या घटनेचे पडसाद बुलडाणा जिल्हयात उमटू न देता सर्वांनी शांतता बाळगावी व सदर घटनेला कोणताही जाणीवपुर्वक रंग देण्याचा प्रयत्न करु नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, कोणतेही आक्षेपार्ह मेसेज पाठवू नये, असे आवाहन शशिकुमार मीना यांनी केले आहे.

Web Title: buldhana news koregaon bhima issue District Superintendent of Police Shashikumar Meena