बाबा रामरहीमसारख्या भोंदूला पाठीशी घालणारे मोदी व फडणवीसही दोषी

संजय सोनोने
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

रामाच्या नावावर अभद्र काम करणाऱ्या बाबापेक्षा महाराष्ट्रातील थोर संताचा विचार अंगीकारावा.

शेगाव : 'राम रहीमसारख्या भोंदू बाबाचा सत्कार करणारे पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीसही दोषी असून, त्यांनाही तुरुंगामध्ये टाकलं पाहिजे,' अशी टीका प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी आज केला.

अपंग मेळाव्यासाठी ते शेगावात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर टीका केली. शेतकरी संपादरम्यानही बच्चू कडू यांनी आक्रमकपणे सरकारवर हल्लाबोल चढवला होता. 

कडू म्हणाले, "रामाच्या नावावर अभद्र काम करणाऱ्या बाबापेक्षा महाराष्ट्रातील थोर संताचा विचार अंगीकारावा." ते म्हणाले, 'सचीन तेंडूलकर सारखा खेऴाडूही सत्यसाईबाबाचे नाव घेऊन षटकार मारतो हे चुकीचे व दुर्दैवी आहे.'

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
राज्य मार्गावरील दारूविक्रीचा मार्ग खुला
भाजपच्या विरोधात शिवसेनेचा 'निष्ठावंत' फॉर्म्युला
नोटाबंदीचा लाभ झाल्याचा दावा; संशयास्पद व्यवहार उघड
सुनील अरोरा नवे निवडणूक आयुक्त; राजीव महर्षी 'कॅग'
सुज्ञ कोल्हापूरकर...!
उजनीचे पाणी पंढरपुरात
इमारतींच्या पुनर्विकासाचा आराखडा सरकारकडे नाही!
दक्षिण मुंबईतील इमारत कोसळून 21 ठार; 12 जखमी
मुंबईतील पावसाच्या बळींची संख्या नऊवर

Web Title: buldhana news modi, fadnavis supports baba ram rahim, blames bachchu kadu