मलकापूर: डोक्यात दगड घालून मित्राची हत्या

murder
murder

मलकापूर : जुन्या वादाचे पर्यवसान हाणामारीत होवून एका युवकाने आपल्याच मित्राच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची निंदनीय घटना शनिवारी, २५ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजेदरम्यान घडली़ आज २६ नोव्हेंबरच्या पहाटे मलकापूर बाजार समितीच्या जून्या यार्डात हा प्रकार उघडकीस आल्याने शहरात एकच खळबळ उडाली.

गजानन मारोती बोरकर (वय २५ वर्षे) हा आपल्या आईसोबत मलकापूर शहरातील रेल्वे स्थानक परिसरात वास्तव्यास आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गजानन बोरकर व सुरज धनंजय इंगळे (वय २६ वर्षे) यांचे मित्रत्वाचे संबध आहे. दोघेही दारु पिण्याच्या सवईचे असल्याने त्यांच्यात नेहमी वाद घडायचे. शनिवार, २५ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता दरम्यान दारुच्या नशेत असतांना या दोघांमध्ये नेहमीप्रमाणे वाद झाले़ वादाचे पयर्वसान हाणामारी झाले. नशेत झिंगलेल्या सुरजने काहीएक विचार न करता गजाननच्या डोक्यात दगडाचे घाव घातले. यामध्ये गजाननच्या डोक्याला जबर मार लागून तो गंभीर जखमी झाला व जमिनीवर कोसळला. याच दरम्यान सुरज इंगळे घटनास्थळावरुन पसार झाला. रक्तबंबाळ अवस्थेत त्याने मदतीची याचना केली, मात्र मदतीस कोणीच धावून आले नाही. दरम्यान डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याने घटनास्थळीच आपला प्राण त्यागला. आज २६ नोव्हेंबर रोजी पहाटे सहा वाजेदरम्यान हा प्रकार उघडकीस आल्याने शहरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती कळताच मलकापुर शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार अंबादास हिवाळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळ पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला. नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ यांचेसह शहरातील असंख्य नागरिकांनीही घटनास्थळी भेठी दिल्या. या प्रकरणी मृतक गजानन याची आई सुमन बोरकर (वय ५० वर्षे) रा रिसोडनाका (वाशिम) ह़मु़ रेल्वेस्टेशन (मलकापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सुरज इंगळे याच्याविरूद्ध मलकापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास हिवाळे यांच्या मार्गदर्शणाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक लवंगळे हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com