मोदी देश के लिए तू तो हानीकारक है... : काँग्रेसची निदर्शने

श्रीधर ढगे
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

फुंडकर पितापुत्र फेकू - सानंदा 
कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर व त्यांचे पुत्र आमदार आकाश फुंडकर हे  फेकू आहेत अशी बोचरी टीका काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केली. कृषिमंत्री बुलडाणा जिल्ह्याचे असतानाही शेतकऱ्यांना न्याय देऊ शकले नाहीत. कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात अवैध धंद्यांचे पीक जोरात आहे. शेतकरी, सर्वसामान्य जनता ,कामगार, मजूर आणि व्यापारी मात्र त्रस्त आहे. निवडणुकीच्या वेळी खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळविली मात्र या फेकु पितापुत्रानी तीन वर्षात  एकही आश्वासन पूर्ण केले नाही असेही दिलीपकुमार सानंदा म्हणाले.

खामगाव : केंद्रातील नरेंद्र आणि राज्यातील देवेंद्र सरकार विरोधात  आज येथील उपविभागीय कार्यलयासमोर  माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या वतीने  तीव्र निदर्शने करण्यात आली.मोदी देश के लिये तू तो हानिकारक है... यासह विविध घोषणा करून सरकारने घेतलेल्या निर्णयाचा यावेळी काँग्रेसने निषेध केला.

सरकारला त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी हे अनोखे विस्मरण सोहळा आंदोलन करण्यात आलं.  सरकारने निवडणुकीत खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळवली मात्र तीन वर्ष झाली तरी त्यांनी एकही आश्वासन पूर्ण केले नाही. केंद्र आणि राराज्यासह  खामगाव मतदार संघात हीच स्थिती आहे. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर हे खामगाव जिल्ह्याचे असताना सुद्धा शेतकरी बांधवाना न्याय देऊ शकले नाहीत. फुंडकर पिता  पुत्रांना दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला. खामगाव जिल्हा, खामगाव मधील मुख्य रास्ता चौपदरीकरण असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्याची आठवून करून देण्यासाठी  विस्मरण सोहळा आंदोलन करत असल्याचे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात. यावेळी केंद्र सरकारने लागू केलेला जीए टी, नोटबंदीचा निर्णय निषध  करण्यात आला. राज्य सरकारने दिलेली कर्जमाफी फसवी असून दिवाळी नंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत असा आरोप यावली करण्यात आला. मोदी देश के लिये तू तो हानी कारक है...गुजरातसे आया था वह... काला धन लानेवाला था वह. .. यासह केंद्र आणि राज्य सरकार विरोधात मुर्दाबाद अशी  जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आनॊदलनात काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: buldhana news narendra modi desh ke liye tu to hanikarak hai, congress