बुलडाणा : रेतीची दरड कोसळून १ ठार, १ गंभीर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 मे 2017

मन नदीची दरड ही 30 ते 35 फूट उंच असतांना तहसील प्रशासनाने ह्या गंभीर बाबीकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले आहे.

शेगाव : बुलडाणा जिल्ह्यातील लोहारा येथील मन नदीत रेतीची दरड कोसळून १ ठार १ गंभीर झाल्याची घटना आज दुपारी ३ वाजता बाळापूर तालुक्यातील लोहारा हद्दीत घडली. 

बाळापूर तालुक्यातील लोहारा येथे आज दुपारी २ मजूर मन नदीच्या रेती घाटात रेतीचा उपसा करीत असतांना त्यांच्या अंगावर अचानक रेतीची दरड कोसळून झालेल्या अपघातात मानेगाव येथील गोकुळ नराळे (वय ३२) हा जागीच ठार झाला असून, विजय चौधरी (वय ३५) हा गंभीर जखमी झाला आहे.

चौधरी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारार्थ अकोला येथे हलविण्यात आल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली आहे याप्रकरणी शेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मन नदीची दरड ही 30 ते 35 फूट उंच असतांना तहसील प्रशासनाने ह्या गंभीर बाबीकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे बाळापूर तहसीलदारांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी मानेगाव येथील नागरिकांनी केली आहे

Web Title: buldhana news sand slide one dead, accident