जलयुक्त शिवारची कामे गेली पुराच्या पाण्यात; बेंबला पात्रातील खर्च व्यर्थ

पंजाबराव ठाकरे
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

29 ऑगस्टच्या पहिल्याच पुराच्या पाण्यामुळे हा खर्च केलेला पैसा पाण्यात गेल्याचे चित्र दिसून येते.

संग्रामपूर : तालुक्यातील चांगेफल गावालगत बेंबला नदी पात्रात या वर्षी जलयुक्त शिवार उपक्रमाअंतर्गत खोलिकरणाचे मोठे काम करण्यात आले होते. मात्र, हा सर्व खर्च मोठ्या पावसानंतर आलेल्या पहिल्याच पुराच्या पाण्यात गेल्याचे चित्र आहे. 

खोलीकरणासोबतच वॉटर रिचार्जसाठी बोअरसुद्धा घेतले आहेत. यासाठी लोखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. 29 ऑगस्टच्या पहिल्याच पुराच्या पाण्यामुळे हा खर्च केलेला पैसा पाण्यात गेल्याचे चित्र दिसून येते. या नदीत बाजूच्या काठाने टाकलेली होती ती खोलीकरणाची रेती आणि माती पूर्णपणे नदी पात्रात पसरल्याने नदी पात्र सपाट बनले आहे.

नदीचे पात्र उथळ झाल्याने पात्रात घेतलेले बोअरसुद्धा भर्ती खाली दबले आहेत. अशा परिस्थितीत पुराचे पाणी खरच जिरवले जाईल का? हाच प्रश्न चर्चेचा विषय ठरत आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
व्हॉट्‌सऍप कॉलवरून बोलताना त्याने मरणाला कवटाळले 
नदीकाठच्या रस्त्याबाबत सुळे-आयुक्त चर्चा 
केशरी शिधापत्रिका होताहेत पिवळ्या; सरकारी योजना लाटण्यासाठी काळबाजार
रस्ते कामाबाबत चीनचे "गोलमाल'
कांद्याच्या भावाला लगाम बसणार
पावसामुळे रेल्वे, बस सेवा विस्कळित 
प्लॅस्टिक नष्ट करण्यासाठी उपाययोजना कराव्यात
उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र जपानवरून झेपावले
मुसळधार पावसाने मुंबईत वाहतूक कोंडी 
'मंथन'ने घडवले मोहक नृत्यदर्शन 

Web Title: buldhana news sangrampur jalyukt shivar yojana failure