यावर्षी श्री गणेशोत्सव 12 दिवसांचा...

संजय सोनोने
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

दुपारी पावणेदोनपर्यंत प्रतिष्ठापनेचा मुहूर्त

शेगाव (बुलढाणा): यावर्षी श्री गणेशोत्सव 12 दिवसांचा राहणार आहे. त्यामूळे गणेशभक्तांच्या आनंदात वाढ होणार आहे. येत्या 25 ऑगस्ट रोजी श्री गणेश स्थापना असून दुपारी पावणेदोनपर्यंत प्रतिष्ठापनेचा मुहूर्त आहे. बारा दिवसांचा उत्सव असल्यामूळे 5 सप्टेबर रोजी गणेश विसर्जन केला जाणार आहे.

दुपारी पावणेदोनपर्यंत प्रतिष्ठापनेचा मुहूर्त

शेगाव (बुलढाणा): यावर्षी श्री गणेशोत्सव 12 दिवसांचा राहणार आहे. त्यामूळे गणेशभक्तांच्या आनंदात वाढ होणार आहे. येत्या 25 ऑगस्ट रोजी श्री गणेश स्थापना असून दुपारी पावणेदोनपर्यंत प्रतिष्ठापनेचा मुहूर्त आहे. बारा दिवसांचा उत्सव असल्यामूळे 5 सप्टेबर रोजी गणेश विसर्जन केला जाणार आहे.

व्रतवैकल्यांचा श्रावण महिना सुरू झाला की आनंदोत्सवांची मालिका सुरू होते. यंदाचा श्रावण महिना सरला असून, आता घराघरात लाडक्या गणरायाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे. यंदा गणेशोत्सव बारा दिवस असल्याने उत्सवात अधिक धमाल करण्याची संधी बच्चे कंपनीला मिळणार आहे. येत्या शुक्रवारी (25 ऑगस्ट) श्री गणेशाचे आगमन होणार आहे. गणेश मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पहाटे 4.30 (ब्राह्ममुहूर्तापासून) वाजल्यापासून दुपारी 1 वाजून 45 मिनिटांपर्यंत मुहूर्त आहे.

या वर्षी श्री गणेशोत्सव बारा दिवसांचा आहे. येत्या गुरुवारी (24 ऑगस्ट) हरितालिका पूजन आहे. शुक्रवारी गणेश चतुर्थी आहे. या दिवशी सकाळी 8 वाजून 24 मिनिटांनंतर भद्रा असली तरी, श्री गणेश स्थापना, प्राणप्रतिष्ठा आणि पूजन करण्यास ती वर्ज्य नाही. त्यामुळे शुक्रवारी ब्राह्ममुहूर्तापासून दुपारी 1.45 पर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने कोणत्याही वेळी श्रीगणेश पूजन करता येईल, असे पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.

दशमीची वृद्धी झाल्याने यंदा गणेशोत्सव बारा दिवसांचा असून, पाच सप्टेंबरला गणेश विसर्जन आहे. त्या दिवशी मंगळवार असला तरी नेहमीप्रेमाणे गणेश विसर्जन करता येते. यापूर्वी 2008, 2009 आणि 2010मध्ये सलग ती वर्षे गणेशोत्सव बारा दिवसांचा होता. आपल्या घरी जेवढे दिवस उत्सव तितके दिवस सकाळी पूजा आणि रात्री आरती, मंत्रपुष्पांजली म्हटल्याने घरातील वातावरण प्रसन्न होते. घरातील मूर्ती सुमारे एक वीत म्हणजेच सात बाय आठ इंच उंचीची असावी. ही मूर्ती आसनस्थ आणि सुबक असावी तसेच ती पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून मातीची अथवा शाडूची असावी जेणेकरून प्रदुषण होणार नाही.

Web Title: buldhana news shree ganeshotsav festival