शेगाव-खामगाव रस्ता चौपदरीकरणात शेकडो झाडांची होणार कत्तल

श्रीधर ढगे
शनिवार, 21 ऑक्टोबर 2017

तर झाडे वाचतील
शेगाव खामगाव मार्गावरील झाडे मोठी व उंच आहेत.त्यामुळे वाहनांची उंची लक्षात घेवून या झाडांच्या फांद्याची छटाई केली तर झाडे वाचू शकतात. रस्ता दुभाजकावर तसेही छोटी झाडे लावल्या जात असतात. त्या जागी ही जुनी झाडे कायम राहू शकतात.याकडे संबधीत विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

खामगाव : शेगाव खामगाव रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरू झाले असून या मार्गाच्या दोन्ही कडेला असलेल्या शेकडो झाडांची कत्तल  केली जाणार आहे.परिणामी या दिंडी मार्गावरील हिरवळ नष्ट होणार आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने ही झाडे तोडण्याऐवजी फांद्याची छटाई केली तर झाडे वाचू शकतात यासाठी पर्यावरण प्रेमी संघटना व कार्यकर्त्यांनी पुढे येण्याची गरज आहे.

खामगाव शेगाव दिंडी मार्गावर दुतर्फा असलेल्या झाडांचे अस्तित्व सद्या धोक्यात आले आहे.या मार्गाचे चौपदरीकरण सुरू झाले आहे.त्यामुळे या रस्त्यावर गेली अनेक वर्षे असलेली झाडे चौपदरीकरणात कापल्या जावू शकतात.सद्या ही झाडे जणू अखेरच्या घटका मोजत आहेत.शेगाब खामगाव दिंडी मार्ग म्हणून ओळखला जातो.शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी एकादशी व गुरुवारी भाविकांची गर्दी राहते. श्रीच्या पालखी सोबत तर लाखो भावीक शेगाव पायी वारी करतात.शेगाव येथील उत्सवाच्या काळात दिंडी मार्गवार भाविकांची रीघ असते.भाविकांना या मार्गावरील झाडे मायेची सावली देत असतात. हळूहळू रस्ता कामात कत्तल होत असल्याने झाडे कमी होत आहेत.आता चौपदरीकरण सुरू असून उरलेल्या सर्व झाडावर संकट आले आहे. ही झाडे तोडली गेली तर पर्यावरणाची मोठी हानी होणार असून दिंडी मार्गावरील हिरवळ नष्ट होणार आहे.सरकार दरवर्षी वृक्ष लागवडीसाठी मोठा निधी खर्च करते. लावलेली बहुतांश झाडे जगत नाहीत. त्यामुळे ही जिंवत झाडे जगविण्यासाठी सरकारने प्रयन्त करायला हवेत.पर्यावरण व वृक्षप्रेमी जनतेने पुढे येण्याची गरज आहे.

तर झाडे वाचतील
शेगाव खामगाव मार्गावरील झाडे मोठी व उंच आहेत.त्यामुळे वाहनांची उंची लक्षात घेवून या झाडांच्या फांद्याची छटाई केली तर झाडे वाचू शकतात. रस्ता दुभाजकावर तसेही छोटी झाडे लावल्या जात असतात. त्या जागी ही जुनी झाडे कायम राहू शकतात.याकडे संबधीत विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Buldhana news tree cutting in Shegaon-Khamgaon road