संग्रामपूरमध्ये विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

सदर युवक आज (बुधवार) सकाळी शेतात कपाशीला पाणी देण्यासाठी मोटर सुरू करण्यासाठी गेला होता.

बुलडाणा - संग्रामपूर तालुक्यातील धामणगाव गोतमारे येथील 28 वर्षीय युवा शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

दत्ता त्र्यंबक गोतमारे असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदर युवक आज (बुधवार) सकाळी शेतात कपाशीला पाणी देण्यासाठी मोटर सुरू करण्यासाठी गेला असता मीटर पेटीमध्ये जबर धक्का बसला. जखमी अवस्थेत उपचारांसाठी नेले असता डॉक्टरकडून मृत घोषित करण्यात आल्याची माहिती आहे. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: buldhana news youth die with electric shock