साखळी येथे वीज पडून सोळा मेंढ्या दगावल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lightning

शेतात बसलेल्या मेंढ्यांच्या कळपावर वीज कोसळल्याने १६ मेंढ्या दगावल्या. तर ४० जखमी झाल्या.

Sheep Died Lightning : साखळी येथे वीज पडून सोळा मेंढ्या दगावल्या

साखळी बुद्रुक शिवारात भिका लोखंडे यांच्या शेतात विजय अंबादास सुसर व विजय माधव बोराडे यांनी मेंढ्या बसविल्या होत्या. त्यांच्याकडे दोनशे मेंढ्या होत्या. ५ मार्चला दिवसभर मेंढ्या चारल्यानंतर त्या शेतात जाळीचे कुंपन घालून बसवण्यात आल्या. दरम्यान, ६ मार्चला पहाटे दोन ते अडीच वाजता ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरू झाला. एक वीज कोसळल्याने १६ मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच ४० मेंढ्या जखमी झाल्या.

मृत्युमुखी पडलेल्या मेंढ्यांमध्ये विजय सुसर यांच्या ७ आणि विजय बोराडे यांच्या मालकीच्या ९ मेंढ्यांचा समावेश आहे. तसेच विजय सुसर यांच्या २० व विजय बोराडे यांच्या २० मेंढ्या जखमी झाल्या. या घटनेमुळे मेंढपाळांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. तलाठ्यांनी सकाळी ९ वाजता पंचनामा केला