बुलडाणा: मोताळा-नांदुरा मार्गावर अपघातात 2 जण ठार

शाहीद कुरेशी
गुरुवार, 18 मे 2017

या मार्गावर बरेच ठिकाणी एका साईडचा रस्ता दुरुस्त केलेला असून दुसऱ्या साईडला खड्डे असल्याने बरेच वाहनधारक आपली साईड सोडून दुसऱ्या बाजूने वाहन चालवितात. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे.

बुलडाणा - मोताळा-नांदुरा मार्गावर आज (गुरुवार) सकाळी पिकअप व अॅपेरिक्षामध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार, तर बारा जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेनऊच्या सुमारास मोताळा-नांदुरा मार्गावरील वरुड फाट्यानजीक घडली. यातील जखमींना मोताळा ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी बुलडाणा येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मोताळा-नांदुरा मार्गावर खड्ड्याचे साम्राज्य असून खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात पिकअप चालकाचे नियंत्रण सुटून अॅपे रिक्षाला धडक दिल्याने अपघात घडल्याचे समजते. 

या मार्गावर बरेच ठिकाणी एका साईडचा रस्ता दुरुस्त केलेला असून दुसऱ्या साईडला खड्डे असल्याने बरेच वाहनधारक आपली साईड सोडून दुसऱ्या बाजूने वाहन चालवितात. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे.

Web Title: Buldhana: Two persons killed in accident on Motala-Nandura road