Video : बुलेट बार्बीक्‍यूचा माहोल 

भूषण काळे 
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

बार्बीक्‍यू म्हणजे टिक्का. परदेशात त्याला बार्बीक्‍यू तर आपल्याकडे टिक्का म्हटले जाते. बुलेट ही बाईक तशी प्रतिष्ठेची. बुलेटवर स्वार होणाऱ्याकडे प्रत्येकच जण कुतूहलाने बघतो. मात्र, याच बुलेटचा वापर करून शहरातील दोन युवकांनी आपला व्यवसाय थाटला अन्‌ अल्पावधीतच बुलेट देसी बार्बीक्‍यू अमरावतीचा ब्रॅंड झाला आहे. 

अमरावती : आकाश प्रांजळे व संदीप आग्रेकर हे दोन मित्र... दोघेही मित्र पदवीधारक... पूर्वी दोघेही मोबाईल सेक्‍टरमध्ये चांगल्या पगारावर कार्यरत होते. दोघांनाही फूडचे विशेष आकर्षण असल्याने व्यवसायच करायचा आणि तोही फूड इंडस्ट्रीमध्ये असे ठरवलं आणि आपले स्वप्न साकारही केले. जवळंचे भांडवल अन्‌ आवड याची 
सांगड घालत दोन मित्रांचा प्रवास मोबाईल सेक्‍टर ते फूड इंडस्ट्री असा सुरू झाला. 

बार्बीक्‍यू म्हणजे टिक्का. परदेशात त्याला बार्बीक्‍यू तर आपल्याकडे टिक्का म्हटले जाते. हे नाव ऐकताच प्रत्येकाच्याच तोंडाला पाणी सुटेल. पण, तुम्ही बुलेट देसी बार्बीक्‍यू हे नाव शर्तीने ऐकले नसेल. अमरावतीकर सध्या बुलेट देसी बार्बीक्‍यूच्या जाम प्रेमात पडले आहे. बुलेट ही बाईक तशी प्रतिष्ठेची. बुलेटवर स्वार होणाऱ्याकडे प्रत्येकच जण कुतूहलाने बघतो. मात्र, याच बुलेटचा वापर करून शहरातील दोन युवकांनी आपला व्यवसाय थाटला आहे. बुलेट देसी बार्बीक्‍यू नावाने बडनेरा मार्गावर या युवकांनी हा व्यवसाय सुरू केला आहे. अन्‌ अल्पावधीतच बुलेट देसी बार्बीक्‍यू अमरावतीचा ब्रॅंड झाला आहे. 

Image may contain: 1 person, standing and outdoor

चेन्नईला फिरायला गेलो असता तेथून ही संकल्पना सुचल्याचे आकाश व संदीपने सांगितले. चेन्नईवरून आल्यानंतर दोन्ही मित्रांचा बुलेट 
बार्बीक्‍यूचा प्रवास सुरू झाला. बुलेटला ग्रील लावावी लागत होती. ग्रील लावल्यानंतर बुलेट चालत नव्हती. हे करताना बऱ्याच अडचणी आल्यात. पण शेवटी 
सर्व सेटअप व्यवस्थित झाले. एका छोट्या पार्टीने व्यवसायाची सुरुवात झाली. सध्या बडनेरा मार्गावर रस्त्याच्या कडेला बुलेट देसी बार्बीक्‍यूवर चांगलीच गर्दी वाढली आहे. सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळात व्यवसाय चालत असल्याचे त्यांनी सांगितले. 

Image may contain: 2 people, motorcycle and outdoor
मित्र आकाश प्रांजळे व संदीप आग्रेकर

सहा केजी ते 70 केजी

सुरुवातीला सहा केजी चिकन खपायचे. सध्या 70 किलो जात आहे. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तब्बल महिनाभर या युवकांनी घरीच बार्बीक्‍यूची प्रॅक्‍टीस 
केली. त्यानंतर व्यवसाय सुरू केला. दुपारी 12 वाजतापासून त्यांच्या कामाला सुरुवात होते. चिकन मॅरिनेट करून पूर्णपणे कोळशाच्या भट्टीवर फ्राय केले जाते. तीन भट्यांवर ही व्यंजने तयार होत असून, बार्बीक्‍यूचा मसाला, बटर, ग्रीन चटणी, मेओनिज आदी सर्वच हे युवक तयार करतात. 

Image may contain: 3 people, people sitting and food

फ्रेंचाईजीही मिळाली

व्यवसाय सुरू करून या युवकांना अवघे नऊच महिने झालेत. मात्र, अवघ्या काही महिन्यातच अमरावतीकर बुलेट देसी बार्बीक्‍यूवर क्रेझी झालेत. अमरावतीतच पंचवटी चौकात व यवतमाळात बुलेट देसी बार्बीक्‍यूची फ्रेंचाईजी सुरू झाली. सोबतच 25 नोव्हेंबरला नागपूर, जानेवारी महिन्यात कंवरनगर तर अकोला येथेही बुलेट देसी बार्बीक्‍यूचा स्वाद चटोऱ्यांना घेता येणार आहे. विशेष म्हणजे, यामधून चार मुलांना रोजगार देखील मिळाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bullet Barbecue in Amravati