बैलबंडी नदीत उलटल्याने महिलेसह बैलाचा बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

मोवाड : बैलबंडीत बसून नदी ओलांडत दुसऱ्या तीरावर शेतीच्या कामाला जात असताना नदीच्या खोलीचा अंदाज आला नाही. परिणामी बैलबंडी नदीत उलटून एका महिलेचा व एका बैलाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. 19) सकाळी 10 वाजताच्या सुमारास मोवाड शहरात घडली.

नर्मदाबाई बाबारावजी बोरकर (वय 55) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या गुरुवारी सकाळी घरानजीकच्या शेजाऱ्यासोबत बैलबंडीत बसून स्थानिक वर्धा नदीच्या पलीकडील शेतात शेती मशागतीच्या कामाला जात होत्या. वर्धा नदीच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात बैलबंडी हेलकावे खाऊ लागली. पाण्याच्या तीव्र वाहत्या पात्राकडे वळून अखेर बैलबंडी धारेत उलटली. यात नर्मदाबाई वाहून गेल्या. जवळपास दोन किलोमीटर अंतरावर त्यांचा मृतदेह आढळला. एका बैलाचाही मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. शेजाऱ्याला पोहणे येत असल्याने तो बचावला. मृत महिलेचा मृतदेह पुढील तपासणीकरिता रवाना करण्यात आला. मृताच्या मागे दोन मुली, एक मुलगा तसेच त्यांचे पती असा आप्तपरिवार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bullock cart drown into river