वाघाच्या हल्ल्यात बैल ठार

File photo
File photo

चंद्रपूर): मूल तालुक्‍यातील चिचाळा परिसरात वाघाच्या हल्ल्यात बैल ठार झाल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.
चिचाळा येथील जंगल परिसरात गुराख्याने जनावरे चारायला घेऊन गेला होता. परतीच्या वेळेस दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने एका बैलावर झडप टाकली. या हल्ल्यात बैल जागीच मृत्यू झाला. बैल चिचाळा येथील प्रवीण लेनगुरे या शेतकऱ्याचा आहे. ऐन खरीप हंगामात एका बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. वनविभागाकडून आर्थिक नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे . पंचनामा वनरक्षक गजेंद्र वरगंटीवार यांनी केला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com